प्रकाश मुंडे/ बीड जिल्हा प्रतिनिधी:-
केज शहरातील प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ दिनकर राऊत व स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ हेमा राऊत यांचा केज तालुका संघर्ष माजी सैनिक संघटनेच्या वतीने विशेष सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.
डॉ दिनकर राऊत व डॉ संध्या राऊत यांच्या दवाखान्यात माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबियाना उपचार करताना विशेष काळजी घेऊन फिस व इतर तपासणी आणि उपचार शुल्कातही मोठी सूट व सवलत दिली जाते. सैनिक देशासाठी सीमेवर मोठे कार्य करतात अशा वेळी त्यांच्यासाठी आम्ही जराशी मदत केली तर त्यात आम्ही एवढे काय करतो असे डॉ हेमा राऊत म्हणतात. तर भविष्यात सैनिक व त्यांच्या परिवारासाठी आमचे हॉस्पिटल त्यांची जमेल ती सेवा करत राहणार असल्याचे डॉ दिनकर राऊत म्हणाले. डॉ दिनकर राऊत यांचा विशेष शोध निबंध आंतरराष्ट्रीय जर्नल मध्ये प्रसिद्ध झाल्याबद्दलही सैनिकांच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
यावेळी माजी सैनिक संघटनेचे केज तालुका अध्यक्ष अजिमोद्दीन शेख, सचिव हनुमंत भोसले, उपाध्यक्ष राम प्रभू राऊत, मस्के, नारायण शिंदे, अनिल सपाटे, शेख इलाही यांच्यासह इतर माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.