प्रकाश मुंडे/ बीड जिल्हा प्रतिनिधी:-
केज शहर खामगाव-पंढरपूर व अहमदपूर-अहमदनगर या दोन प्रमुख महामार्गाच्या जोडणीवर असल्याने येथून दररोज हजारो प्रवासी महाराष्ट्राच्या कानाकोऱ्यात ये-जा करत असतात. किल्लेधारूर चे बसआगार केजसाठी सोयीचे नाही. तसेच येथून दूर पल्याच्या गाड्या केज येथून सुटणे गरजेचं आहे. यासाठीच
केज येथे राज्यपरिवहन मंडळाचे 'बसआगार' सुरू करावे या मागणीसाठी केज विकास संघर्ष समिती गेली पंधरा वर्षांपासून पाठपुरावा करत आहे. यासाठी समितीने सतत लेखी निवेदने व तोंडी विनंती करूनही अद्याप कार्यवाही झालेली नाही. यासाठी पुन्हा एकदा येत्या मंगळवार दि 22 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता केज तहसील कार्यालयासमोर धरणे व उपोषण आंदोलन सुरू करणार आहे. केज येथे बसआगारासाठी 7 एक्कर हुन अधिक जागा केज
-बीड महामार्गालगत आरक्षित आहे. मात्र राज्यपरिवहन मंडळाच्या हलगर्जीपणा मुळे ही जागा सध्या पडून आहे. हळू हळू ही जागा आता अतिक्रमण धारकांच्या विळख्यात जाऊ शकते. यासाठी या जागेवर 'बसआगार' स्थापित करावे तसेच आता इलेक्ट्रिक बसगाड्यांची वाढती संख्या पाहता याच जागेत अशा बसगाड्या इलेक्ट्रिक चार्जिंग सेंटर सुरू करण्याची मागणी समितीने केली आहे. किमान आतातरी शासनाने वरिष्ठ पातळीवर केजच्या बसडेपो स्थापित करून येथे मोठे इलेक्ट्रिक बसगाड्या चार्जिंग सेंटर सुरू करावी अशी समितीने मागणी समितीने केली आहे. या आंदोलनात केजवासीयांची मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते हनुमंत भोसले यांनी केले आहे.
या निवेदनावर समन्वयक हनुमंत भोसले, शेषराव घोरपडे, नासेर मुंडे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. निवेदनाच्या प्रती महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक, आमदार नमिता ताई मुंदडा, उप महाव्यवस्थापक संभाजीनगर, विभागीय नियंत्रक बीड, आगार प्रमुख किल्लेधारूर यांना पाठवण्यात आलेल्या आहेत.