shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्रीरामपूरमध्ये शिवसृष्टी पुतळ्याच्या कामाचा भव्य शुभारंभ -

एक कोटीच्या निधीतून शिवसृष्टी साकारणार ' श्रीरामपूर करांची ४१ वर्षाची प्रतीक्षा संपली = 
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील 

 
  वडाळा  महादेव [  प्रतिनिधी ]
 श्रीरामपूर शहराच्या इतिहासातील अत्यंत महत्वाच्या क्षणाचा साक्षीदार ठरलेला हा दिवस. शहरातील शिवाजी रोडवरील भाजी मंडईसमोर छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवसृष्टी पुतळ्याच्या उभारणीच्या कामाचा शुभारंभ आज पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

या ऐतिहासिक प्रसंगी जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, माजी नगराध्यक्ष अनुराधाताई आदिक, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, भाजपाचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब चिडे, माजी तालुकाध्यक्ष दीपक पटारे, 
 अशोक कानडे, मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप, भाजपा सांस्कृतिक जिल्हाध्यक्ष बंडूकुमार शिंदे, शहराध्यक्ष मारुती बिंगले, 
          मा नगरसेवक संजय फंड, उद्योजक श्रीनिवास बिहानी, गौतम उपाध्ये, नानासाहेब पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. याशिवाय सतीश सौदागर, हंसराज बत्रा, किरण कर्नावट, महेश सुळ, आनंद बुधेकर, अशोक उपाध्ये, अक्षय गाडेकर, श्रेयश झिंरंगे,, महेंद्र पटारे, स्वामीराज कुलथे, विशाल अंभोरे, विजय शेलार,  विजय आखाडे ,राहुल पांढरे ,भैय्या भिसे, पत्रकार रमण मुथा, मनोज आगे यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे शहर व तालुक्याचे अनेक पदाधिकारी, शिवप्रेमी, श्रीराम भक्त, सामाजिक संस्था, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
          कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, "श्रीरामपूरकरांची ४१ वर्षांची प्रदीर्घ प्रतीक्षा आज संपली आहे. अनेक वर्षांपासून शहरवासीयांची इच्छा होती की, छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ भव्य पुतळा श्रीरामपूरच्या मध्यवर्ती ठिकाणी उभारला जावा. या जनतेच्या स्वप्नपूर्तीसाठी आम्ही कटिबद्ध असून, शिवसृष्टी स्वरूपात भव्य पुतळा साकारण्यात येणार आहे."
           विखे पाटील यांनी स्पष्ट केले की, "या प्रकल्पासाठी एक कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर करून आणला आहे. शिवसृष्टी संकल्पनेतून छत्रपती शिवरायांचे पराक्रम, जीवनगौरव आणि त्यांचे विचार यांचा प्रचार व प्रसार करण्याचा हेतू आहे. शिवसृष्टीमुळे येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा मिळेल." लवकरच जेव्हा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ भव्य पुतळा उभा राहील, तेव्हा संपूर्ण शहरात दिवाळीसारखा आनंद साजरा केला जाईल. हा क्षण माझ्यासाठीही अत्यंत विशेष आणि आनंददायी असेल," असे उद्गार विखे पाटील यांनी काढले.या कार्यक्रमाच्या प्रारंभी पुतळ्याच्या जागी विधिवत पूजन करण्यात आले. पंडितांनी मंत्रोच्चाराद्वारे भूमीची शुद्धी करून पुतळ्याच्या स्थळावर शुभारंभ केला. उपस्थित नागरिकांनी फटाके फोडून आणि जल्लोष करून या सोहळ्याचे स्वागत केले.
          या निर्णयामुळे संपूर्ण श्रीरामपूर शहरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिक, व्यापारी, विद्यार्थी, महिला मंडळे व सामाजिक संघटनांनी पुतळा उभारणीच्या निर्णयाचे स्वागत करत पालकमंत्री विखे पाटील व प्रशासनाचे आभार मानले आहेत. अनेकांनी सांगितले की, हा पुतळा केवळ एक शिल्प नसेल, तर श्रीरामपूरच्या अस्मितेचा आणि अभिमानाचा प्रतीक असेल. 
          या शिवसृष्टी प्रकल्पाची लवकरच प्रत्यक्ष उभारणी सुरू होणार असून, यासाठी आवश्यक सर्व प्रक्रियांना गती देण्यात आली आहे. या पुतळ्यामुळे श्रीरामपूथर शहराचा ऐतिहासिक व सांस्कृतिक गौरव अधिक वृद्धिंगत होणार असून, राज्यात एक वेगळे स्थान प्राप्त होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.सर्व शिवप्रेमींचे बंडूकुमार शिंदे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले
 

सदर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या राहिलेल्या परवानग्या भाजपा जिल्हाध्यक्ष नितीनभाऊ दिनकर यांच्या प्रयत्नातून पूर्ण झाल्या लवकरच या पुतळ्याचा लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या शुभहस्ते पार पडेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला,
भाजपा जिल्हा अध्यक्ष 
नितीन भाऊ दिनकर  
close