*जय भवानीगड विकास प्रतिष्ठानने जपली उज्वल यशाची परंपरा कायम
सलग सहा वर्षे 100% निकाल*
इंदापूर : जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संचलित,
विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज लाखेवाडी मध्ये उच्च माध्यमिक बोर्ड परीक्षा 2025 च्या परीक्षेसाठी विद्यालयातील एकूण 251 विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते, त्यापैकी 251 विद्यार्थी पात्र झाले आहेत म्हणजेच विद्यालयाचा 100 % निकाल लागला आहे.
विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज लाखेवाडी मध्ये विज्ञान व कॉमर्स अशा दोन शाखा असून दोन्ही शाखेतील उच्च माध्यमिक बोर्ड परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे.
251 विद्यार्थ्यांपैकी 241 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह पास झाले आहेत. 10 विद्यार्थी द्वितीय श्रेणीने पास झाले आहेत.
विज्ञान विभागातील एकूण 221 विद्यार्थी पात्र ठरले आहे त्यांचा गुनानुक्रमे निकाल खालील प्रमाणे
1) चौरे यशराज सुहास
528/600 88.83%
2) अनपट दीक्षा धनाजी
520/600 86.67%
3) निंबाळकर गायत्री महादेव
519/600 86.50%
वाणिज्य विभाग
1) जाधव सानिका हनुमंत
479/600 79.83%
2) गोसावी दीक्षा चंद्रकांत
477/600 79.50%
3) राजमाने अक्षय नागनाथ
477/600 79.50%
4)चिंचकर अनुराधा शरद
466/600 77.67%
यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष मा .श्री.श्रीमंत ढोले,उपाध्यक्ष सौ.चित्रलेखा ढोले, सचिव श्री. हर्षवर्धन खाडे सहसचिव सौ. पौर्णिमा पोर्णिमा खाडे,
मुख्य सल्लागार श्री. प्रदीप गुरव, विश्वस्त चि. पृथ्वीराज ढोले,
चि. ऋषिकेश ढोले, विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य श्री. गणेश पवार,
प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य श्री. राजेंद्र सरगर, विद्यानिकेतन कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य श्री. सम्राट खेडकर, मार्गदर्शक शिक्षक यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.