shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पत्रकारांशी हुज्जत घालणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा ,अन्यथा तहसीलसमोर आंदोलन...!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृतसेवा आहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.

मंगळवार ०६ मे २०२५.

पत्रकारांशी हुज्जत घालणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा तहसीलसमोर आंदोलन...!!

राहुरी : पत्रकारांना अरेरावी व दमदाटी करून बातमी घेण्यास मज्जाव करणाऱ्या गोडाऊन किपरवर दोन दिवसात कारवाई करण्यासाठी सर्व पत्रकारांनी तहसीलदार नामदेव पाटील यांना दिले निवेदन

राहुरी येथील दोन पत्रकार बातमी घेत असताना गोडाऊन किपर शिंदे नामक व्यक्तीने एक पत्रकार शूटिंग घेत असताना मोबाईल हिसकावुन घेतला. तसेच अरेरावी व दमदाटी करुन बातमी घेण्यास मज्जाव केला. या बाबत संबंधित गोडाऊन किपरवर दोन दिवसांत कारवाई करण्यात यावी. अन्यथा तहसील कार्यालया समोर तालुक्यातील समस्त पत्रकारांच्या वतीने तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा पत्रकारांच्या वतीने देण्यात आला.

पत्रकारांना अरेरावी व दमदाटी करून बातमी घेण्यास मज्जाव करणाऱ्या गोडाऊन किपरवर दोन दिवसात कारवाई करण्यासाठी सर्व पत्रकारांनी तहसीलदार नामदेव पाटील यांना दिले निवेदन...

 राहुरी येथील तहसील कार्यालयाच्या आवारातील गोडाऊन जवळ दि. २ मे २०२५ रोजी दुपारी १२ वाजे दरम्यान पुरवठा विभागातील धान्याचा काळाबाजार होत असल्याची माहिती मिळाल्याने पत्रकार मनोज साळवे व अनिल कोळसे हे त्या ठिकाणी बातमी घेण्यासाठी गेले. त्यावेळी पत्रकार मनोज साळवे हे मोबाईलवर शूटिंग घेत असताना तेथे गोडाऊन किपर शिंदे नामक व्यक्ती आला व त्याने पत्रकार मनोज साळवे यांच्या हाथातून मोबाईल हिसकावुन घेतला. आणि तुम्ही शूटिंग कशी काय घेता, शूटिंग घेण्यासाठी माझी लेखी परवानगी घेतली का? असे म्हणुन त्याने पत्रकारांना बातमी घेण्यास मज्जाव केला. या घटने बाबत राहुरी तालुक्यातील समस्त पत्रकारांनी आज दि. ५ मे रोजी एकत्र येऊन तहसीलदार नामदेव पाटील यांना निवेदन दिले. गोडाऊन किपर शिंदे याच्यावर कायदेशीर कारवाई करावी, त्याचे निलंबन करुन खातेनिहाय चौकशी करावी, दोन दिवसांत कारवाई न झाल्यास समस्त पत्रकारांच्या वतीने तहसील कार्यालयासमोर तिव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी पत्रकारांच्या वतीने देण्यात आला.

          दिलेल्या निवेदनावर मनोज साळवे, अनिल कोळसे, विलास कुलकर्णी, निसारभाई सय्यद, संजय कुलकर्णी, वसंतराव झावरे, राजेंद्र वाडेकर, गणेश विघे, अनिल देशपांडे, सुनील भूजाडी, रफिकभाई शेख, अनिल जाधव, विनित धसाळ, मिनाष पटेकर, शरद पाचारणे, राजेंद्र उंडे, गोविंद फुणगे, श्रीकांत जाधव, ऋषी राऊत, आर आर जाधव, सतिष फुलसौंदर, बंडू म्हसे, अशोक मंडलीक, रियाज देशमुख, कर्णा जाधव, सुनिल रासने, समीर शेख, आकाश येवले, कृष्णा गायकवाड, सचिन पवार, राजेंद्र परदेशी, दिपक साळवे, दिपक मकासरे, महेश कासार, अप्पासाहेब मकासरे, राजेंद्र पवार, प्रसाद मैड, अपना टिके, देवेंद्र शिंदे, श्रेयस लोळगे आदि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Shirdi Express Live🎥#वृत्तसेवा करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (आहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

close