shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहूजी महाराज यांच्या १०३ व्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन.-अशोक सब्बन*भारतीय जनसंसद

अहिल्यानगर:-
*मागासलेल्या जाती जमाती साठी सरकारी नोकरीत 50 टक्के राखीव जागा देण्याचा देशातील पहिला जाहीरनामा करवीर संस्थानात राबविणारा राजा


*आंतरधर्मीय - आंतरजातीय विवाहास व नोंदणी पद्धतीस मान्यता देणारा कायदा

*सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा कायदा

*स्रियांच्या छळवणूकीस प्रतिबंध करणारा कायदा

*विविध जाती धर्मियांसाठी कोल्हापूरचा काडीमोड कायदा

*अनौरस संतती व जोगतिणी यांच्या विषयीचा कायदा

*कोल्हापुरात मल्ल विद्या, बलोपासना महत्त्व वाढावे म्हणुन सरकारी खर्चाने तालीमी उभारून जाहीर कुस्त्यांचे आखाडे आयोजन* (हलगीच्या तालावर आज ही असे आयोजन गावोगावी होते)

*संगीत ,चित्रकलाआणि नाटक यांना राजाश्रय देऊन त्या कलांचा बहर देशभर पसरवणारा राजा

*धार्मिक ग्रंथातील भाकड कथांचा फोलपणा सांगून लोकांना सत्य धर्म पाळण्याचा मार्ग दाखवणारा राजा

*पोलिस पाटलांना शिक्षण देणाऱ्या शाळा

*प्रत्येक गावात शाळा स्थापण्याचा जाहीरनामा

*विवीध जाती धर्मातील मुलांसाठी राज्यभर वसतिगृहे उभारून सक्तीचे शिक्षण ही मोहीम सुरू करणारा राजा
*शाळांमधील  स्पर्शास्पर्श बंद करणारा राजा

*जोगिणी - देवदासी प्रथा निर्मुलनसाठी प्रयत्न
             
 *अवघ्या 48 वर्षाच्या आयुष्यात डोंगरा एवढे महान कार्य उभे करणाऱ्या  या समाज कल्याण करणाऱ्या राजाकडून परिवर्तन कार्याची स्फूर्ती घेऊन त्यांच्या स्मृतींना वंदन करु या.
close