श्रीरामपूर / प्रतिनिधी:
येथील महसूल विभागातील
सेवानिवृत्त कर्मचारी गफुर पठाण तथा सेवानिवृत्त मुख्याध्यापिका सिराजुन्नीसा गफुरखान पठाण मॅडम यांची नात, प्राथमिक शिक्षक बॅंक कर्मचारी फय्याज पठाण व कोर्ट विभाग कर्मचारी रियाज़ पठाण यांची पुतणी आणी अलमिजान उर्दू प्राथमिक शाळेतील शिक्षिका व मंगल कार्यालयाचे व्यवस्थापक सामाजिक कार्यकर्ते नियाज़ पठाण यांची सुकन्या डॉ. बतूल फरहत नियाज़ पठाण हिने वैद्यकीय सेवेतील बी.ए. एम.एस.ची डिग्री परिक्षेत यशस्वीरित्या यश संपादन केले.
डॉ.बतूल हिने प्रवरा मेडिकल ट्रस्ट च्या आयुर्वेद कॉलेज व श्री एकनाथ आयुर्वेद रुग्णालय शेवगांव जि. अहिल्यानगर येथून रुद्राक्ष बॅच २०१९- २५ मध्ये आपले कोर्स पूर्ण केले.
या कोर्समध्ये तिने नेत्रदीपक यश मिळविल्याबद्दल जमिल काकर मेडिकल फौंडेशन व काकर समाज महामंचच्या वतीने अध्यक्ष इकबाल इस्माईल काकर यांच्या हस्ते अभिनंदन करुन त्यांचा सत्कार करण्यात आला. तिच्या या यशाबद्दल श्रीरामपूर विधानसभेचे आमदार हेमंत ओगले, माजी उपनगराध्यक्ष तथा कॉंग्रेस नेते कारण ससाणे, सचिन गुजर, उपनगराध्यक्ष हाजी मुझफ्फर शेख, डॉ. शिरसाठ ऍक्सीडेंट हास्पिटल चे डॉ. दिलीप शिरसाठ, अमानत नागरी सह.पतसंस्थेचे चेअरमन ज़मीर बागवान, बाळासाहेब फरगडे, डॉ. तुपे, डॉ. संकल्प शिरसाठ, डॉ. सातदिवे, डॉ. रविन्द्र पांडे, डॉ. तौफिक शेख, डॉ. मतीन शेख तथा शहर आणी तालुक्यातील वैद्यकीय क्षेत्रासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी तीचे अभिनंदन केले आहे.
*वृत्त विशेष सहयोग
इकबाल काकर (सर) श्रीरामपूर
*वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मिडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111