shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

लक्ष्मीबाई भाऊराव पाटील विद्यालयास *कर्मवीर पारितोषिक प्रदान

शौकतभाई शेख / श्रीरामपूर:
 नगर शहरातील अग्रगण्य असलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील विद्यालयास चालू शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठीचा सर्वोत्कृष्ट कामगिरीच्या गौरवाप्रित्यर्थ रयत शिक्षण संस्थेचे सर्वोच्च कर्मवीर पारितोषिक नुकतेच प्रदान करण्यात आले. 

सर्वोच्च गुणवत्ता प्राप्त विद्यालयाचे फेर मूल्यांकन करून दिले जाणारे पारितोषिक असे या पारितोषिकाचे स्वरूप आहे. कर्मवीर स्पर्धा प्रमाणपत्र परीक्षा, शालेय स्तरावरील सर्व स्पर्धा परीक्षा, शालेय निकाल, शालेय चित्रकला परीक्षा, विद्यार्थी प्रगती, विद्यार्थी आरोग्य व स्वच्छता, शाळाबाह्य विविध उपक्रमात शाळेचा सहभाग, शासनामार्फत राबविल्या जाणाऱ्या उपक्रमातील व स्पर्धांमधील सहभाग व कार्यवाही, स्पोकन इंग्लिश प्रकल्प, अध्ययन व अध्यापनात संसाधनाचा उपयोग, शिक्षण व्यावसायिक कौशल्य, शालेय भौतिक सुविधा या  विद्यालयातील उल्लेखनीय बाबी आदी निकषांची पूर्तता व त्याबाबत पुराव्यांची तपासणी करून या पारितोषिकासाठीचे मूल्यांकन केले गेले.
या पारितोषिकाचे वितरण पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या ६६ व्या पुण्यतिथी कार्यक्रमानिमित्ताने ९ मे रोजी सातारा येथील कर्मवीर समाधी परिसरात महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना. मकरंद आबा पाटील, खासदार सुप्रियाताई सुळे, चेअरमन चंद्रकांत दळवी यांचे शुभहस्ते विद्यालयाच्या मुख्याध्यापिका छायाताई काकडे, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य दादाभाऊ कळमकर, उत्तर विभागीय अध्यक्ष आमदार आशुतोष काळे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी ना. अजित पवार, मीनाताई जगधने, आमदार रोहित पवार, उत्तर विभागीय अधिकारी नवनाथ बोडखे, जनरल बॉडी सदस्य अर्जुनराव पोकळे, ज्ञानदेव पांडुळे, ज्येष्ठ शिक्षक महादेव भद्रे, प्रभाकर थोरात, राजेंद्र देवकर, विजय मोहिते, सुप्रिया निमसे आदीजन उपस्थित होते.

*वृत्त विशेष सहयोग
डॉ.शरद दुधाट, श्रीरामपूर 

*वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मिडिया सर्व्हिसेस 
 श्रीरामपूर - 9561174111
close