shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

चिमणपुरी पिंपळे येथे जलसंधारण कामाची पाहणी; सीईओ मीनल करणवाल यांची कौतुकाची थाप.

चिमणपुरी पिंपळे येथे जलसंधारण कामाची पाहणी; सीईओ मीनल करणवाल यांची कौतुकाची थाप.

अमळनेर:-  तालुक्यातील पिंपळे खू (चिमणपुरी) गावात जल व मृदासंधारणाच्या कार्याची पाहणी करण्यासाठी जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी नुकतीच भेट दिली. या वेळी त्यांनी धरती माता शेतकरी गट, ग्रामस्थ सेवा सहयोग संस्था, पाणी फाउंडेशन आणि ग्रामस्थांच्या लोकसहभागातून सुरू असलेल्या नाला खोलीकरणाच्या कामाचे कौतुक केले.

करणवाल मॅडम यांनी विद्यार्थ्यांच्या अभ्यासशिकेलाही भेट दिली आणि ही प्रेरणादायी आहे असे सांगत त्यांना शाबासकीची थाप दिली. तसेच, जलमृदासंधारणासाठी धरती माता गटाच्या प्रयत्नांचे कौतुक करत महिला आणि मान्यवरांच्या सहभागाची विशेष दखल घेतली.

ग्रामपंचायतीच्या वतीने सीईओ करणवाल यांचे स्वागत लोकनियुक्त सरपंच सौ. वर्षा युवराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गटविकास अधिकारी एन. आर. पाटील यांनी देखील पाहणी करत उपस्थित मान्यवरांना मार्गदर्शन केले. त्यांनी शेतकऱ्यांना मॉडेल शेत तयार करण्यासाठी लागणाऱ्या विविध कामांची कागदपत्रे पूर्ण केल्यानंतर तत्काळ मंजुरी देण्याचे आश्वासन दिले.

या प्रसंगी तंटामुक्त अध्यक्ष निंबा बापू चौधरी, रवींद्र पाटील, सामाजिक कार्यकर्ते युवराज पाटील, पाणी फाउंडेशनचे अधिकारी सुनील पाटील व गुणवंत पाटील, सेवा संयोग संस्थेचे सुरेश पाटील, ग्रामसेवक किरण लकेश, अंगणवाडी व आरोग्य सेविका, ग्रामरोजगार सेवक तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.


close