5 व 6 मे 2025 रोजी झालेल्या वादळ-पावसामुळे फळपिकांचे, घरे व पशुधनाचे मोठे नुकसान; पंचनामे करून तात्काळ मदतीची मागणी.
एरंडोल ता. 10 मे जळगाव जिल्ह्यात 5 व 6 मे 2025 रोजी अवकाळी पाऊस व वादळ यामुळे मोठ्या प्रमाणात शेती व जनतेचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी किसान सेलच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले.
या निवेदनात अवकाळी पावसामुळे विशेषतः केळी, आंबा, संत्री, द्राक्ष, लिंबू, मका, ज्वारी, बाजरी यासारख्या फळपिकांचे व शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच ही सर्व पिके फळपीक विमा योजनेच्या अंतर्गत येत असल्यामुळे तातडीने शेतांवर जाऊन पंचनामे करून शासकीय मदतीसाठी प्रस्ताव पाठवण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
प्रदेशाध्यक्ष मा. सुनील तटकरे, आमदार अनिलदादा पाटील, जिल्हाध्यक्ष संजय पवार व जिल्हा कार्याध्यक्ष योगेश देसले यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा अध्यक्ष ईश्वर पाटील लाला सर यांच्या प्रमुख उपस्थितीत हे निवेदन देण्यात आले.
निवेदनादरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयातील आरडीसी पाटोळे साहेबांनी त्वरित कारवाई करत फळपीक विमा अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याचे आदेश दिले असून त्याची प्रत लवकरच मिळणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
याशिवाय, गोरगरीब नागरिकांची घरे कोसळणे व काहींच्या पशुधनाचे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले असून त्यासाठी देखील तातडीने चौकशी करून मदतीसाठी पाठपुरावा करण्याची मागणी करण्यात आली आहे.
प्रत माहितीसाठी निवेदनाची प्रत पुढील मान्यवरांना देण्यात आली आहे:
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषी मंत्री, मुख्य सचिव कृषिमंत्री कार्यालय, आपत्ती व्यवस्थापन विभाग, पालकमंत्री – जळगाव जिल्हा
निवेदन देताना उपस्थित पदाधिकारी:
ईश्वर पंडित पाटील, राजेंद्र रामदास चौधरी, अरुण भाऊ जगताप, मुकुंदा ठाकूर, सुखदेव माळी, सुनील पाटील, सागर पाटील, अतुल पाटील, दिलीप पाटील, राजेंद्र धनगर, सतीश घुगे, भरत पाटील, नंदकिशोर पाटील, शेख कलीम, दीपक पाटील व इतर कार्यकर्ते.