shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

एरंडोल मध्ये राष्ट्रीय लोकअदालतीत २२ प्रकरणांचा यशस्वी निपटारा;१०.५२ लाख रुपयांची तडजोड.


*शिर्डी एक्सप्रेस*  *एरंडोल मध्ये राष्ट्रीय लोकअदालतीत २२ प्रकरणांचा यशस्वी निपटारा;१०.५२ लाख रुपयांची तडजोड.*  *तालुका विधी सेवा समिती,एरंडोल यांच्या वतीने आयोजित लोकअदालतीत दाखलपूर्व व प्रलंबित प्रकरणांमध्ये तडजोडीने न्यायदान.*  *सविस्तर बातमी* 👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻 https://www.shirdiexpress.com/2025/05/blog-post_13.html *व्हॉट्सअप गृप* https://chat.whatsapp.com/C863pVRjBme2KMVvLUI9Iv  *६१ लाख वाचकांचे मनपसंद राष्ट्रीय न्यूज पोर्टल व साप्ताहिक*

तालुका विधी सेवा समिती,एरंडोल यांच्या वतीने आयोजित लोकअदालतीत दाखलपूर्व व प्रलंबित प्रकरणांमध्ये तडजोडीने न्यायदान.

एरंडोल | तालुका विधी सेवा समिती,एरंडोल येथे दिनांक १० मे २०२५ रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले. या लोकअदालतीत एकूण २२ प्रकरणांचा यशस्वी निपटारा करण्यात आला असून त्यामध्ये एकूण रु. १०,५२,९००/- इतक्या रकमेची तडजोड करण्यात आली आहे.

या लोकअदालतीत दाखलपूर्व (Pre-litigation) एकूण ९ प्रकरणे निकाली काढण्यात आली, ज्यात रु. ६,३६,०००/- ची तडजोड करण्यात आली. तसेच न्यायालयात प्रलंबित असलेल्या एकूण १३ प्रकरणांमध्ये तडजोड साधण्यात आली असून त्यातून रु. ४,१६,९००/- ची तडजोड झाली.

या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी तालुका विधी सेवा समितीच्या अध्यक्षा तथा दिवाणी न्यायाधीश श्रीमती बी. ए. तळेकर पॅनल प्रमुख म्हणून उपस्थित होत्या. त्यांच्यासोबत पंच न्यायाधीश म्हणून विधिज्ञ श्री. हिम्मतराव बी. पाटील उपस्थित होते.

या प्रसंगी अ‍ॅड. आकाश एन. महाजन (सचिव, तालुका वकील संघ, एरंडोल), अ‍ॅड. प्रेमराज पाटील (सहसचिव), अन्य विधिज्ञ, वकिल मंडळी, तसेच न्यायालयीन कर्मचारी व संबंधित अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राष्ट्रीय लोकअदालतीच्या माध्यमातून न्यायप्रणालीतील प्रलंबित भार कमी करून, नागरिकांना जलद व माफक खर्चात न्याय मिळावा या हेतूने हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला.

close