आरोग्य आणि समाजसेवेत योगदान दिल्याबद्दल १ मे २०२५ रोजी संघटनेत महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली.
शिवतेज माहिती अधिकार संघटनेच्या आरोग्य विभागाच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी श्री. जितेंद्र पाटील यांची सर्वानुमते व सहर्ष निवड करण्यात आली आहे.
माहिती अधिकार व पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असताना अनेक अडचणींवर मात करत त्यांनी चळवळीला बळकट करण्यासाठी केलेल्या योगदानाची दखल घेऊन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. हारून अ. समद शेख व राष्ट्रीय महासचिव श्री. योगेश प्र. दंदणे यांच्या मार्गदर्शनाखाली व शिफारशीने ही नियुक्ती करण्यात आली.
दिनांक ०१ मे २०२५ रोजी ही नियुक्ती अधिकृतपणे घोषित करण्यात आली. श्री. पाटील यांचे आरोग्य क्षेत्रातील कार्य, संघटनात्मक कामगिरी आणि समाजासाठी केलेले योगदान पाहून ही जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
नवीन नियुक्त अध्यक्ष म्हणून श्री. जितेंद्र पाटील हे भारतीय संविधानाच्या मूल्यांना अनुसरून सामाजिक न्याय, माहिती अधिकार व गरजूंना वैद्यकीय मदत मिळवून देण्यासाठी सक्रिय राहतील, असा विश्वास संघटनेतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
संघटनेतील अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करत भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यांनी रुग्णसेवा व समाजकार्य निःस्वार्थीपणे सुरू ठेवून समाजासमोर एक आदर्श निर्माण करावा, अशी सदिच्छा व्यक्त करण्यात आली.
या निवडीमुळे खान्देश भागात आनंदाची लाट उसळली असून आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशनच्या वतीने सह सचिव संदिप ब्रम्हे यांनी यासंदर्भातील माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.