अमळनेर प्रतिनिधी :- पंकज पाटील
जिल्हा अध्यक्ष दिपक पाटील यांनी खान्देशी रील्स स्टार हर्षदा महाले ताईंची तालुका अध्यक्ष नुकतीच निवड केली. पण आठवड्याभरात हर्षदा ताईच काम बघुन व उत्तम प्रकारे आपली जबाबदारी पार पाडली असल्यामुळे लगेच जिल्हा कार्यकारिणी पदी निवडी केली.
दिपक पाटील यांनी असे सांगितले की महाराष्ट्रात चाललें राजकीय वातावरण यामुळे विद्यार्थ्यांवर होणार परीणाम बघताना महाराष्ट्रत आम्ही या आधीही अनेक पदाधिकारी यांच्या नियुक्ती केल्या आहेत परंतु जळगाव जिल्ह्यात मला विद्यार्थांना बदल जास्त संकोच वाटतो की विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दृष्टीकोनातून अनेक बेकायदेशीर कामासाठी विद्यार्थ्यांकडून पैसे घेतले जातात कुठंतरी शिष्यवृत्ती पासून वंचित असतात अशा अनेक प्रकारच्या प्रश्नांना कडे बघताना मी जळगाव जिल्हा अध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळत आहे परंतु जिल्हा, तालुका, गण, गट, गावं, असल्याने विभागीय विद्यार्थ्यांना माझ्या पर्यंत संपर्क न करता येतं असल्याने आधीच्या पदाधिकारी यांना आपण बरखास्त करून संघटनेशी आधी पासून एकनिष्ठ असून सक्षम असे जिल्हा तालुकास्तरीय पदाधिकारी यांची नेमणूक करत आहोत माहिती दिली.