श्रीरामपूर / प्रतिनिधी:
येथील विद्रोही विद्यार्थी संघटनेचे ऍड.अमोल सोनवणे यांनी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतीकारी विचारातून शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा ही प्रेरणा घेऊन प्रतिकूल परिस्थितीत खासदार गोविंदराव आदिक विधी महाविद्यालय श्रीरामपूर येथून आपले (एल एल बी) चे शिक्षण पुर्ण करून लॉ ची पदवी संपादन केल्याच्या निमित्ताने विविध सामाजिक संघटनें च्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
विविध सामाजिक संघटने च्या कार्यकत्यांनी ऍड. अमोल सोनवणे यांच्या कार्याचे कौतुक करून त्यांच्या पुढील भावी कार्यास शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी शंभुक विद्यार्थी वसतिगृहाचे अशोकराव दिवे,बामसेफचे रमेश मकासरे, फ्रांन्सिस शेळके, सर्जेराव देवरे,भारतीय बौध्द महासभेचे सुगंधराव इंगळे, प्रकाश सावंत,के.सी. दाभाडे, निवृत्ती पगारे, भाऊसाहेब हिवराळे,विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे डॉ. सलिम शेख,अकबर शेख, वंचित बहुजन चे संतोष त्रिभुवन, विजय जगताप, सुनिल वाघमारे,भाकप (माले) कॉंम्रेड जीवनराव सुरुडे, परिवर्तन फाउंडेशन चे मेजर कृष्णा सरदार, संभाजी कोळगे, डॉ.संजय दुशिंग, श्रीराम ट्रेडर्स चे रामभाऊ सुगुर,कवी रज्जाक शेख, कवी आनंदा साळवे, बुध्दीस्ट इंटरनॅशनल चे सुरंजन साळवे,सक्षम फाउंडेशन चे सुशिल पठारे, अमोल मिसाळ, नामदेव शिंपी समाज पंच मंडळ श्रीरामपूर चे कैलास खंदारे, राजमुद्रा वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक मुश्ताकभाई तांबोळी, सामाजिक कार्यकर्ते ऍड.राजेश बोर्डे, के. टी. साळवे, एफ. एन. वाघमारे, गौतम राऊत आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी संतोष त्रिभुवन, विजय जगताप,पी.डी. सावंत, के. सी. दाभाडे यांनी विशेष परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शंभुक वसतिगृहाचे अशोकराव दिवे यांनी केले तर आभार प्रदर्शन सक्षम फाउंडेशन चे सुशिल पठारे यांनी केले.
*वृत्त विशेष सहयोग
अशोकराव दिवे (सर) श्रीरामपूर
*वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मिडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111