राळेगणसिद्धी येथे राज्यस्तरीय पर्यावरण कार्यशाळा उत्साहाही वातावरणात संपन्न
श्रीरामपूर / प्रतिनिधी:
पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन केले तरच पर्यावरण टिकू शकेल अन्यथा आपल्याला गंभीर दुष्परिणाम भोगावे लागतील. २००६ चा कायदा प्रभावी अमलात आणणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन पद्मश्री चैत्राम पवार यांनी केले.
अहिल्यानगर जिल्ह्याच्या पारनेर तालुक्यातील राळेगणसिद्धी येथे निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण मंडळ महाराष्ट्र व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिन व वृक्षमित्र स्वर्गीय आबासाहेब मोरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित राज्यस्तरीय पर्यावरण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते. मंडळाचे मार्गदर्शक ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री अण्णासाहेब हजारे व वन्यजीव विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्याचे सदस्य पद्मश्री चैत्राम पवार, विशेष सरकारी वकील ॲड. सुरेश लगड, मंडळाच्या सचिव वनश्री गुणवरे-मोरे, छायाताई रजपूत, तुकाराम अडसूळ आदी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण संपन्न झाले. गरुड फाउंडेशनचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल पर्यावरण स्नेही अमोल चंदनशिवे व महेश पाडेकर यांचा पद्मश्री चैत्राम पवार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
आगामी काळात संपूर्ण राज्यात अतिशय झपाट्याने निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे काम चालू राहणार आहे. मंडळाच्या वतीने वृक्षारोपण वृक्षसंवर्धन विविध पानवटे, पशुपक्ष्यांसाठी मुठभर धान्य घोटभर पाणी, पर्यावरण संमेलन, पर्यावरण कार्यशाळा, संपूर्ण राज्यभर पर्यावरणाच्या विविध शाखांचे उद्घाटन आयोजित केले जाणार आहे. संपूर्ण राज्यात पर्यावरण संतुलनाचे काम सर्वच पर्यावरण स्नेहींच्या मदतीने व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे सहकार्याने केले जाणार असल्याचे निसर्ग सामाजिक पर्यावरण निवारण मंडळाचे अध्यक्ष प्रमोददादा मोरे यांनी सांगितले. यावेळी लतिका पवार, चंद्रकांत भोजने, आनंदा झरेकर, संतोष परदेशी, वैशाली राठोड, वैभव फापाळे, अनिल लोखंडे, विजय बोडखे, वैभव मोरे, किसन पिचड, कोमल मोरे, उत्तम पवार, मीनाक्षी मोरे, सरपंच बाळासाहेब ढोले, बाळासाहेब गाडेकर, राजेंद्र आहेर, संजय कारखिले, सुनील कारले, मोहन कवळे, शोभा काळे, कल्पना भांबरे, पद्मा राजपूत, आशा कांबळे, वर्षा घुले, अर्जुन राऊत, प्रकाश केदारी, उत्तम पवार आदीसह पर्यावरण स्नेही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*वृत्त विशेष सहयोग
डॉ.शरद दुधाट (सर) श्रीरामपूर
*वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मिडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर 9561174111