shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शेवगांव सार्व.बांध. उपविभागाची राज्यस्तरीय प्रशंसनिय कामगीरी


राज्यस्तरीय प्रशंसनीय कामगिरीची दखल..,
अभियंता प्रल्हाद पाठक यांना गौरवपत्र प्रदान..!

अहिल्यानगर / प्रतिनिधी:
महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे राबविण्यात आलेल्या "Transformative 100 Days" विशेष मोहिमेत शेवगांव येथील उपविभागीय सरकारी कार्यालयाने उल्लेखनीय प्रगती साधली आहे. या यशस्वी कार्यगिरीबद्दल प्रल्हाद पाठक, उपविभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग, शेवगांव यांना राज्य शासनातर्फे सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

    राज्यातील विविध सरकारी कार्यालयांमध्ये सुधारणा व प्रभावी कार्यवाहीस प्रोत्साहन देण्यासाठी "१०० दिवसांची विशेष मोहीम" हाती घेण्यात आली होती. या मोहिमेअंतर्गत शेवगांवच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने उत्कृष्ट कामगिरी करत राज्यस्तरीय निवडीत स्थान पटकावले. 

   राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले आणि अपर मुख्य सचिव श्रीमती मनीषा पाटणकर-समंतकर यांच्या हस्ते हा गौरवपत्र दिनांक २९ मे २०२५ रोजी प्रदान करण्यात आला.
या सन्मानामुळे शेवगांव उपविभागाच्या कार्यक्षमतेची राज्यस्तरावर अधिकाधिक दखल घेतली जात आहे. प्रल्हाद पाठक आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे कार्य हे इतर उपविभागांसाठी प्रेरणादायक ठरत आहे. त्यांना मिळालेल्या या सन्मानाबद्दल नुकताच अहिल्यानगर येथे त्यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी उप कार्यकारी अभियंता ए. एस. तारगे, उपाभियंता जावेद सय्यद, रियाज शेख, प्रकाश थोरात आदी.उपस्थित होते.

वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मिडिया सर्व्हिसेस
 श्रीरामपूर - 9561174111
close