प्रकाश मुंडे/बीड जिल्हा प्रतिनिधी.
मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न डिजिटल मिडिया मराठी पत्रकार परिषदेची महत्वपूर्ण आयोजित बैठक केज येथे विश्रामगृहात संपन्न झाली.
यावेळी मराठी पत्रकार परिषदेच्या डिजिटल मीडिया मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष दिनकर शिंदे सर यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. पञकारांना येणाऱ्या विविध अडचणी दूर करण्यासाठी डिजिटल मिडिया मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने मुख्य विश्वस्त एस एम देशमुख सर यांच्या मार्गदर्शनाखाली कसे विविध प्रयत्न शासन दरबारी चालू आहेत याची संपूर्ण माहिती डिजिटल मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष दिनकर शिंदे सरांनी यावेळी सांगितली. तसेच केज व धारूर तालुक्यातील डिजिटल मीडिया मराठी पत्रकार परिषदेच्या पदाधिकाऱ्यांच्या व सदस्यांच्या निवडी जाहीर करून त्यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली.
सदर बैठकीस डिजिटल मीडिया मराठी पत्रकार परिषदेचे केज तालुका अध्यक्ष रामदास तपसे, तालुका सचिव प्रकाश मुंडे , कार्याध्यक्ष इकबाल भाई शेख, संघटक अजय भांगे ,सनी शेख, दशरथ चौरे ,अशोक सोनवणे ,रमेश गुळगुले ,धनंजय कुलकर्णी ,चंद्रकांत पाटील व धारूर तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.