एस बी पाटील इंटरनॅशनल व पब्लिक स्कूलचे बेसबॉल क्रीडा स्पर्धेत राष्ट्रीय विजेतेपद
-बंगलोर येथे शनिवारी राष्ट्रीय स्पर्धा संपन्न
इंदापूर : प्रतिनिधी दि.15/6/25
वनगळी-इंदापूर येथील शहाजीराव पाटील विकास प्रतिष्ठान संचलित एस बी पाटील इंटरनॅशनल इंटरनॅशनल व पब्लिक स्कूलच्या अकरा वर्षाखालील मुलांच्या संघाने बंगलोर येथे झालेल्या मेजर बेसबॉल लीग कप ((MLB CUP INDIA 2025 ) क्रीडा स्पर्धेत मुंबई ब्रेव संघाचा पराभव करीत प्रतिष्ठेचे समजले जाणारे राष्ट्रीय विजेतेपद शनिवारी (दि.14) मिळविले.
एस बी पाटील इंटरनॅशनल व पब्लिक स्कूलने राष्ट्रीय स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या सामन्यात मुंबई ब्रेव संघावर 14 - 02 असा मोठ्या फरकाने दैदीप्यदीप्यमान असा विजय मिळवीत स्कुलचा देशात नावलौकिक प्राप्त केला आहे. या विजयी संघामध्ये सार्थक माने, सार्थक रोकडे, अभिनव घाडगे, इंद्रनील घोगरे, रेयंश आगलावे, प्रज्वल शेटे, श्रीवर्धन ढुके, विराज भोंग, स्वराज भोंग, यशराज मारकड, रोहन देवकाते, सुशांत कोळेकर या विद्यार्थी खेळाडूंचा समावेश आहे. या खेळाडूंना क्रीडाशिक्षक साहिल बागवान, सचिन फुले, राहुल धोतरे, सौरभ बोराटे यांचे मार्गदर्शन लाभले.
बेसबॉल राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत देशपातळीवरील या सर्वोत्कृष्ट कामगिरी बद्द्ल संस्थेचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, सचिव भाग्यश्री पाटील, उपाध्यक्षा अंकिता पाटील ठाकरे, विश्वस्त राजवर्धन पाटील, संस्थेचे सीईओ संतोष देवकर आदींनी विजयी खेळाडूंचे व प्रशिक्षिकांचे अभिनंदन केले आहे.
दरम्यान,सर्वांसाठी आणखी अभिमानाची गोष्ट म्हणजे मुख्य प्रशिक्षक साहिल बागवान ह्यांची आता All INDIA Baseball U-11 MLB Star's ह्या भारताचे भविष्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करणाऱ्या संघाच्या हेड कोच पदी निवड झाली आहे.
•चौकट:-
इंदापुरात सोमवारी विजयी संघाची मिरवणूक!
----------------------------------------------
बेसबॉल खेळाला अलीकडच्या काळात जगामध्ये मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे देश पातळीवरील सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल बेंगलोर हून आगमनप्रसंगी विजयी संघाचे सर्व खेळाडु व प्रशिक्षकांची सोमवारी (दि.16) दुपारी 12 वा. इंदापूर आय कॉलेज ते बाबा चौक अशी भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यानंतर विजयी संघाच्या खेळाडूंचा सत्कार समारंभ एस बी पाटील इंटरनॅशनल स्कूल, वनगळी येथे दुपारी 1 वा. करण्यात येणार आहे, अशी माहिती एस बी पाटील ग्रुप ऑफ स्कूलच्या वतीने देण्यात आली.
_____________________________
फोटो:-बेंगलोरे येथे अंतिम फेरीत विजय मिळविल्यानंतर आनंदोत्सव साजरा करताना एस बी पाटील इंटरनॅशनल व पब्लिक स्कूलचा विजेता संघ.