अजित पवार यांचे विचार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची विचारधारा बळकट करू - अतुल झगडे.
इंदापूर: अजितदादा पवार यांचे विचार तळापर्यंत पोहोचवण्याचे काम करू आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची विचारधारा बळकट करूअशी ग्वाही इंदापूर तालुका पार्टीचे कार्याध्यक्ष अतुल झगडे यांनी दिली.
इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ( अजित पवार गट)पक्ष कार्यालय इंदापूर येथे पक्षाचा 26 वा वर्धापन दिन पक्षाचा झेंडा उभारून व एकमेकांना पेढे भरवून व फटाक्यांच्या आताशबाजीमध्ये तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या वतीने साजरा करण्यात आला.
यावेळी इंदापूर तालुक्याचे अध्यक्ष हनुमंत कोकाटे, कार्याध्यक्ष अतुल झगडे यांच्यासह इंदापूर तालुका, शहर व जिल्हा कार्यकारणीतील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आचार विचार रूढी परंपरा जपण्याचे जे
धोरण आहे, समाजातील मागासलेल्या घटकांच्या पाठीशी उभे तत्परतेने उभे राहणे तसेच शंभर टक्के पैकी 80 टक्के समाजकारण तर 20 टक्के राजकारण
पक्षाचे अध्यक्ष
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धोरण आहे हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे धोरण समजून प्रत्येक गावागावात घराघरात पोचवण्याची काम या पक्षाच्या माध्यमातून आम्ही करत आहे. इंदापूर तालुक्याचे आमदार राज्याचे मंत्री आमचे नेते नामदार दत्तात्रय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर तालुक्याचा सर्वांगीण विकास होत आहे. या विकासाच्या माध्यमातून सर्व समाजाला बरोबर घेऊन समोपचार साधून एक चांगला विकास घडवण्याचे काम हे मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून घडत आहे. याच पद्धतीने या वर्धापन दिनाच्या निमित्ताने या विकासाच्या माध्यमातून मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून जे काम चालू आहे.आम्ही सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणखी ताकतीने मंत्री दत्तात्रय भरणे यांची ताकद वाढवण्याचा प्रयत्न करू आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विचार घरोघरी पोहोचवण्याचे काम करू अशा शब्दात शुभेच्छा देताना कार्याध्यक्ष अतुल झगडे यांनी आपली मत व्यक्त केले.
----------------------
चौकट:
उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्याचे मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या विचाराला साथ देणारे इंदापूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व यांना पुणे यांना वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला जात असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला इंदापुरात तीन वेळा
दत्तात्रय भरणे यांच्या नेतृत्वाने आमदारकी पटकवून, एकदा राज्यमंत्री, आत्ता कॅबिनेट मंत्री हे दत्तात्रय भरणे व पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या पाठीमागे कायम राहील अशी अपेक्षा आज व्यक्त करतो. यावर्षीच्या वर्धापन दिनाला शुभेच्छा देतो.
- इंदापूर तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे.
---------------------------------------
चौकट:
भविष्यात या तालुक्याचा विकास होण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढवण्याच्या शुभेच्छा देतो.
- धनंजय बाब्रस.
-------------=====