shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापूर तालुक्यातील पहिल्या कॅथलॅबच्या अनावरणाच्या पार्श्वभूमीवर पत्रकारची हृदयरोग तपासणी.इंद्रेश्वर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल प्रायव्हेट लि. इंदापूर वतीने इंदापूर तालुक्यातील पत्रकारांची मोफत हृदयरोग तपासणी संपन्न.

इंदापूर तालुक्यातील पहिल्या  कॅथलॅबच्या अनावरणाच्या पार्श्वभूमीवर पत्रकारची  हृदयरोग तपासणी.

इंद्रेश्वर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल प्रायव्हेट लि. इंदापूर वतीने इंदापूर तालुक्यातील पत्रकारांची मोफत हृदयरोग तपासणी संपन्न.
इंदापूर : इंद्रेश्वर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड इंदापूर यांच्यावतीने इंदापूर तालुक्यातील पहिली कॅथलॅब सेवा सुरू करत असल्याकारणाने इंदापूर तालुक्यातील पत्रकार बांधवांसाठी मोफत हृदयरोग तपासणी सोमवारी 9 जून 2025 रोजी दुपारी 2 ते 5 या वेळेत संपन्न झाली. 

यावेळी तालुक्यातील सुमारे 50 पत्रकारांची ईसीजी, ब्लड शुगर, ब्लड प्रेशर, क्रियाटीनीन, जे हाय रिस्क रुग्ण आहेत त्यांची टूडी इको  ( हृदयाची सोनोग्राफी ) कारियाक मार्कर्स ( लिफिड प्रोफाइल ) सवलतीच्या दरात होणार आहेत.

  आहार,व्यायाम, जीवनशैली, याबद्दल कार्डिओलॉजी डॉ. रोहन हेगडे यांनी मार्गदर्शन केले.

तसेच यावेळी डॉ. अविनाश पाणबुडे यांनी हॉस्पिटलमध्ये नुकतेच कार्यान्वित झालेल्या प्रधानमंत्री व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना तसेच सुरू होणाऱ्या कॅथलॅब संदर्भात सविस्तर माहिती दिली.
 यातून गरीब रुग्णांवर खात्रीशीर इलाज चालू असून यापुढेही अधिकाधिक सुसज्ज सेवा देण्यावर भर देण्यात येईल याची ग्वाही त्यांनी दिली.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक इंद्रेश्वर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल  प्रायव्हेट लिमिटेडचे चेअरमन डॉ. अनिल शिर्के  यांनी सर्व पत्रकारांचे स्वागत करून पत्रकार बांधवांच्या वाढत्या तणाव व त्यामुळे उद्भवणाऱ्या रक्तवाहिन्यासंबंधीचे आजार यावर उपाययोजना करण्यासाठी व लवकरच सुरू होत असलेल्या इंदापूर तालुक्यातील पहिल्या  कॅथलॅबच्या अनावरणाच्या पार्श्वभूमीवर पत्रकार बांधवांसाठी हृदयरोग तपासणी व त्या संदर्भातील उपायोजना यांची यावेळी माहिती दिली.तर उपस्थित पत्रकार बांधव व डॉक्टरांचे डॉ. मनोज वाघमोडे यांनी आभार मानले.

 यावेळी डॉ मंगेश पाटील,डॉ. अमोल रासकर, डॉ अतुल वनवे, डॉ. बिचुकले, डॉ अमीर मुलांनी, डॉ. अर्जुन नरुटे,डॉ. शैलेश काळेल, डॉ श्रद्धा भोसले, डॉ. प्रणाली सरगर इत्यादी उपस्थित होते.
 
 या कार्यक्रमाला सहकार्य डॉ एकनाथ चंदनशिवे, डॉ. किसन शेंडे, डॉ. शिवाजीराव खबाले, , डॉ. राकेश कर्डिले, डॉ. महेश रुपनवर, डॉ. रियाज पठाण,डॉ. रविराज शिंदे, डॉ. पंकज दोशी, डॉ. भाग्यवंत टिळे, डॉ. पाडूळे, डॉ. संतोष शेलार, डॉ. सचिन फडे, शितल बोरा व हॉस्पिटल मधील स्टाफ यांचे सहकार्य लाभले.
 यावेळी डॉ. संदेश शहा म्हणाले पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असून त्यामध्ये पत्रकारांचे स्थान महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे पत्रकारांच्या मानसिक व शारीरिक तंदुरुस्तीसाठी त्यांची आरोग्य तपासणी करून त्यांना दीर्घायुष्यासाठी  मार्गदर्शन करण्याचा स्तुत्य उपक्रम इंद्रेश्वर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व्यवस्थापनाने राबविला असून हा उपक्रम स्तुत्य व आदर्श आहे

 यावेळी पत्रकारांच्या वतीने तानाजी काळे यांनी इंदापूर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या सर्व डॉक्टरांचे ऋण व्यक्त केले.
close