प्रवास अधिक सुसज्ज – सुविधा वृद्धिंगत करण्यासाठी आणखी २० बसेससाठी पाठपुरावा सुरूच..
लोकार्पण सोहळा आज सकाळी आमदार अमोलदादा पाटील यांच्या शुभहस्ते पार पडला.
एरंडोल (प्रतिनिधी) –
एरंडोल तालुक्यातील नागरिकांसाठी दिलासादायक बातमी! येथील एसटी आगारास आमदार मा. अमोलदादा पाटील यांच्या अथक प्रयत्नांतून ५ नवीन बीएस-६ तंत्रज्ञानाधारित सुसज्ज एसटी बसेस प्राप्त झाल्या आहेत. गुरुवारी रात्री या बसेस घेऊन चालक दापोडी येथील वर्कशॉपहून रवाना झाले आणि आज शुक्रवारी पहाटे त्या एरंडोलमध्ये दाखल झाल्या.
या बससेवा वाढीमागे आमदार पाटील यांचा परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक यांच्याकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा व एसटी प्रशासनाशी समन्वय कारणीभूत ठरला. एरंडोल व पारोळा तालुक्यातील वाढती प्रवासी संख्या आणि फेऱ्यांची अपुरी संख्या लक्षात घेता ही बससेवा आता खऱ्या अर्थाने उपयुक्त ठरणार आहे.
आज सकाळी या बससेवांचे लोकार्पण आमदार अमोलदादा पाटील यांच्या हस्ते थाटात पार पडले. यावेळी जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील, धरणगाव बाजार समितीचे सभापती शालिकभाऊ गायकवाड, आगार व्यवस्थापक निलेश बेंडकुळे, युवासेना तालुकाप्रमुख कमलेश पाटील, शहरप्रमुख अतुल मराठे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या बसेस अशोक लेलँड कंपनीच्या असून बीएस-६ तंत्रज्ञान प्रणालीवर आधारित आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या स्वमालकीच्या या बसेस असून, अधिकाधिक फेऱ्यांसाठी त्यांचे नियोजन करण्यात येणार आहे.
आमदार अमोलदादा पाटील यांनी यावेळी सांगितले की, "उर्वरित २० बसेस मिळवण्यासाठीही लवकरच यश मिळवू. तसेच एरंडोल आगाराचे नुतनीकरण, पारोळा येथे आगार दर्जा, कासोदा येथे बसस्थानक यांसाठी प्रयत्नशील आहोत."
उपस्थित मान्यवरांची यादी:
जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील
धरणगाव बाजार समितीचे माजी सभापती शालिकभाऊ गायकवाड
आगार व्यवस्थापक निलेश बेंडकुळे
विधानसभा क्षेत्रप्रमुख सुदामतात्या राक्षे
उपसभापती किरणदादा पाटील
मा. तालुकाप्रमुख बबलुदादा पाटील
युवासेना तालुकाप्रमुख कमलेश पाटील
मा. नगरसेवक चिंतामण पाटील
शहरप्रमुख अतुल मराठे
टोळी सरपंच बाळासाहेब पाटील
मुकुंदा पाटील (बाम्हणे)
आगारातील अधिकारी व कर्मचारी