जि. प.प्राथमिक शाळा सपकळवाडी येथे पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत.
इंदापूर : शाळा प्रवेशोत्सव २०२५ कार्यक्रमाअंतर्गतजिल्हा परिषद प्राथमिक शाळा सपकळवाडी (ता. इंदापूर)येथे पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी छत्रपती कारखान्याच्या संचालिका सुचिता सपकळ, सरपंच रोहिणी सोनवणे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष योगेश सपकळ, जिल्हा नियोजन समिती मा. सदस्य विद्यमान उपसरपंच सचिन सपकळ, सारिका पवार, सचिन पवार, सुनीता सपकळ, पोलीस पाटील बोबडेताई,सोपान सपकळ, नामदेव सपकळ, शिक्षक वर्ग सर्जे मॅडम, नाळे सर,भुजबळ मॅडम, रेखा मॅडम, उपस्थित होते.
यावेळी तुषार भैय्या सपकळ मित्र परिवार यांच्या कडून सर्व विद्यार्थ्यांना वही पेन चे वाटप करण्यात आले.