प्रकाश मुंडे/ बीड जिल्हा प्रतिनिधी :-
केज नगरपंचायतचा अजब कारभार पुन्हा एकदा पाहायला मिळतोय . मुख्य बाजारपेठ असलेला मंगळवार पेठेचा रस्ता, नाली बांधकामाच्या नावाखाली पूर्ण खोदून व्यापाऱ्यांना वेठीस धरण्याचे काम नगर पंचायत करत आहे.
गेली अनेक दिवसांपासून HPM कंपनी ही केज शहरातील नाली व रस्ता बांधकाम करत आहे. 1 किलोमीटर नालीचे काम गेली 07 वर्षापासून सुरू आहे .नाली काम व पेव्हर ब्लॉक चे काम जागोजागी खचले असून निकृष्ट दर्जाचे झाले आहे. त्यावर वारंवार आंदोलन व तक्रारी करूनही काही उपयोग झाला नाही .अशाच पध्दतीने मंगळवार बाजारपेठेतील मुख्य रास्ता गेली 05 दिवस खोदून ठेवला आहे.
व्यापारी व नागरिकांना पर्यायी रास्ता उपलब्ध न करता शनिमंदिर रोड व मंगळवार पेठ रोड दोन्हीही खोदले आहेत .परिणामी मंगळवार व्यापरपेठेतील दुकानदार त्रस्त आहेत .पेरणीचे दिवस असल्याने कृषी सेवा केंद्र ,व्यापारी त्रस्त झाले आहेत .खत ,बी बियाणे घेऊन जाण्यासाठी लोकांना वाहने आणता येत नाहीत, बाजारपेठेत असलेल्या रुग्णालया मध्ये रुग्णांना येता येत नाही. शाळेतील मुले व महिला नागरिक यांना रास्ता नसल्याने त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासन व लोकप्रतिनिधी यांना वेळोवेळी विनंती करूनही काही उपयोग होत नाही ही सर्व मंडळी याकडे दुर्लक्ष करत आहेत. दोन दिवसांपूर्वी HPM कंपनी पर्यायी रास्ता करण्यास आली असता काही नगरसेवक यांनी त्याला विरोध करून परत पाठवले व सर्व रस्ता खोदून वाहतूक बंद केली, तरीही नगरपंचायत प्रशासन दुर्लक्ष करत आहे. नगर पंचायतचे मुख्यकार्यकारी अधिकारी गायब आहेत.
त्यांना केज शहरात काय चालू आहे याची कल्पनाच नाही आशा परिस्थितीत व्यापारी बिचारे राजकारणाला बळी पडत आहेत. लवकरच नगर पंचायत व संबंधित गुत्तेदार यातून मार्ग काढतील अशी प्रार्थना मंगळवार पेठेतील व्यापारी वर्ग करत आहे. वास्तविक हा रस्ता 33 फुटाचा आहे पर्यायी पंधरा ते सोळा फुटाचा रस्ता जरी खुला केला वाहनधारकांना तरी यातून मार्ग निघू शकतो असे व्यापारी वर्गाचे मत आहे.