shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिव शाहू फुले आंबेडकर विचार प्रबोधनीतर्फेमेजर सरदार यांचा सन्मान झाल्याबद्दल सत्कार


श्रीरामपूर / प्रतिनिधी:
श्रीरामपूर येथे वैचारिक परिवर्तनवादी चळवळ व शिव शाहू फुले आंबेडकर विचार प्रबोधनी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित प्रबोधन व गौरव सोहळा २०२५ मध्ये मा. कृष्णा मेजर सरदार (सेवानिवृत्त नायब सुभेदार, सामाजिक कार्यकर्ते) यांना सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, क्रीडा व पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल गौरवचिन्ह प्रदान करण्यात येवून सन्मान करण्यात आला.
या गौरवाच्या निमित्ताने माजी नायब तहसीलदार उत्तमराव दाभाडे व ॲड. संजय निवृत्ती तांबे यांच्या हस्ते मेजर सरदार यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमास रामचंद्र सुगुर , गोरख आढाव (युनायटेड इंडिया इन्शुरन्स), वैद्य सर (केंद्रप्रमुख), राहुल सुगुर (मालक, श्रीराम ट्रेडर्स), अमोल शिरसाठ आदी मान्यवर उपस्थित होते.

मेजर सरदार यांच्या विविध क्षेत्रातील सेवाभावपूर्ण कार्याबद्दल परिसरातील नागरिकांकडून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव होत आहे. या गौरवसोहळ्याने सामाजिक जागृती व प्रेरणादायी नेतृत्वाचे महत्व अधोरेखित केले आहे.

वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मिडिया सर्व्हिसेस
 श्रीरामपूर -9561174111
close