जि. प. प्राथमिक शाळा कदमवस्ती येथे ईरेम इंडिया व भगवान मोरे यांच्यावतीने शाळेच्या पहिल्या दिवशी देण्यात आली शैक्षणिक साहित्य.
इंदापूर: सण 2025-26 वर्षाच्या शिक्षणाचा जून 2025 हा पहिला दिवस असून ईरेम इंडियाचे संस्थापक शर्मिला गुंजाळ किसन गुंजाळ आणि मयूर गुंजाळ
यांच्यावतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कदमवस्ती
यांना स्पोर्ट्स ड्रेस देण्यात आले.*
तसेच भगवानराव मोरे उपसरपंच गलांडवाडी नंबर १ यांच्या वतीने सर्व मुलांना वही पेन पेन्सिल चे वाटप करण्यात आले*
तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कदमवस्ती यांच्या वतीने आज विद्यार्थ्यांचे पुस्तके, वह्या, पेन्सिल, पुष्पगुच्छ खाऊ आणि स्पोर्ट्स ड्रेस, पुस्तक, गणवेश, बूट सॉक्स वाटप करण्यात आले.
याप्रसंगी भगवान मोरे उपसरपंच गलांडवाडी नंबर 1, मोबाईल शॉपी चे मालक देविदास वीर, प्रशांत जाधव, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश कदम, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य कृष्णा कदम, स्वप्नाली कदम, स्वाती देवकर, कुसुम ननवरे
शाळेचे मुख्याध्यापक वसंत फलफले यांनी प्रस्ताविक केले आणि शाळेच्या उपशिक्षिका सारिका भोंग यांनी सर्वांचे आभार मानले.