इंदापूर : दि 16 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बांडेवाडी येथे नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात मोठ्या उत्साहात झाली. पहिल्या दिवशी नवागताचे औक्षण व पुष्प वृष्टी करून वाजत गाजत स्वागत करण्यात आले. यावेळी शाळेच्या पहिल्या दिवशी पाठ्यपुस्तके , गणवेश , बुट सॉक्स, शैक्षणिक साहित्य व गोड खाऊ वाटप करण्यात आला. मुले आनंदाने सहभागी झाली.
प्रसंगी शाळा समिती अध्यक्ष बापूसो राहीगुडे, सदस्य सचिन बांडे , संतोष डोंगरे , अमोल बांडे , दीपक चिंधे , इब्राहिम अंसारी, अश्विनी राहीगुडे उपस्थीत होते. अंगणवाडी सेविका सुनंदा पोंदकुले व मदतनीस उर्मिला बांडे यांनी सहकार्य केले. मुख्याध्यापक संतोष हेगडे यांनी स्वागत केले. उप शिक्षिका कांचन रणपिसे यांनी आभार मानले.