shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

गौराईमळा शाळेत शाळेच्या पहिल्याच दिवशी नवागतांचे उत्साहात स्वागत*

*गौराईमळा शाळेत शाळेच्या पहिल्याच दिवशी  नवागतांचे उत्साहात स्वागत*
       इंदापूर: जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गौराईमळा या ठिकाणी सन २०२५:२०२६ या शैक्षणिक वर्षाची सुरुवात मोठ्या उत्साहात करण्यात आली . प्रथम मुलांचे गुलाब पुष्प ,चाॅकलेट व बिस्किट पुडा देऊन स्वागत करुन १००% दाखलात पुर्ण करुन इयत्ता पहिलीत १००% मुलांनी प्रवेश घेतला .त्या बद्दल उपस्थित पालकांचे मनापासुन आभार मानण्यात आले .
             या शैक्षणिक वर्षात पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तक सर्व मुलांना गणवेश व बुट,पायमोजे याचे वाटप करण्यात आले .दुपारी जिलेबी व व्हेजिटेबल पुलाव भात याचे जेवण देण्यात आले. या कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल नाझरकर , तंटामुक्तीचे अध्यक्ष तात्यासाहेब शिंगाडे , शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्या अनुराधा शिंगाडे , मनिषा जाधव, अंगणवाडी सेविका सुनिता सोनवणे , मदतनीस कल्पना जाधव  व मल्हारी जाधव इत्यादी पालक उपस्थित होते.
close