इंदापूर : खोरोची येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साखरे वस्ती येथे सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून इयत्ता पहिलीत दाखल होणाऱ्या सर्व मुलांचे सौ अनिताताई खरात यांनी औक्षण करून
नवगतांचे स्वागत केले . तसेच मान्यवरांच्या हस्ते मोफत पाठ्यपुस्तके देण्यात आली. त्यानंतर सर्व मान्यवरांच्या हस्ते शाळेच्या प्रांगणात वृक्ष लागवड करण्यात आली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्या. काकासाहेब जाधव यांनी केले.
यावेळी अनिताताई खरात म्हणाल्या की, जिल्हा परिषद शाळा या सध्या अतिशय उत्कृष्ट मूल घडवत आहेत आणि पालकांनी आपली मुलं जास्तीत जास्त जिल्हा परिषद शाळेत पाठवावीत तसेच प्रत्येक जिल्हा परिषद शाळेच्या परिसरातील पालकांनी आपली शाळा म्हणून जिल्हा परिषद शाळेकडे लक्ष द्यावे. शिक्षकांनीही काही अडचण आली तरी आम्हाला केव्हाही सांगावे.आम्ही त्याचं निरसन करण्याचा प्रयत्न करू. परंतु मुलांच्या शिक्षणात कोणती हि काटकसर नका. आज सर्वात जास्त अधिकारी जिल्हा परिषद शाळेत शिकून आलेले आहेत. जे अधिकारी बाहेर जिल्हा परिषद शाळेतून शिकून गेले त्यांनी प्रत्येकाने आपल्या आपल्या गावातील जिल्हा परिषद शाळा कडे लक्ष द्यावे. त्या सुधारण्यासाठी प्रयत्न करावेत.कारण आपला पाया हा जिल्हा परिषद शाळेपासूनच भक्कम झाला आहे. याचा विसर त्यांनी पडू देऊ नये.तसेच साखरे वस्ती शाळेच्या मुख्याध्यापक जाधव गुरुजी व मल्लिकार्जुन वच्छे गुरुजी यांचे त्यांनी कौतुक केले.
या कार्यक्रमाप्रसंगी शाळा समितीचे अध्यक्ष गणेश साखरे, मारुती भाळे,शाळेचे मुख्याध्यापक अंगणवाडी सेविका व शिक्षक स्टाप उपस्थित होता.
या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शाळेचे उपक्रमशील शिक्षक मल्लिकार्जुन वचे गुरुजी यांनी मानले.