प्रकाश मुंडे/बीड जिल्हा प्रतिनिधी :-
14 ऑक्टोबरच्या शासन निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी व शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी शिक्षक समन्वय संघ महाराष्ट्र राज्य यांनी महा एल्गार पुकारला आहे .आठ व नऊ जुलै रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व शाळा बंद ठेवून शासनाच्या विरोधात निषेध आंदोलन मुंबई येथील आझाद मैदानावर करण्यात येणार आहे. केज शहरातील प्राध्यापक विश्वनाथराव कराड उच्च माध्यमिक विद्यालय केज , तालुका केज , जिल्हा बीड येथील टीम मुंबईच्या दिशेने आझाद मैदानावरील आंदोलनासाठी रवाना झाले आहे .
माझी पगार माझी जबाबदारी हे ब्रीदवाक्य धारण करून. अंशता शाळा टप्पा वाढीसाठी विधानसभेतील पुरवणी मागणी मध्ये आर्थिक तरतूद न झाल्याने आठ व नऊ जुलै रोजी राज्यातील प्राथमिक , माध्यमिक , व उच्च माध्यमिक या सर्व शाळा बंद ठेवून या आंदोलनात महाराष्ट्र राज्य शिक्षक समन्वय संघ पूर्ण ताकतीनिशी उतरला आहे. प्राध्यापक अनंत आघाव सर यांच्या नेतृत्वाखाली केज मधून देखील या आंदोलनात सक्रिय सहभागी होण्यासाठी शिक्षकांची मोठ्या प्रमाणात मुंबईच्या दिशेने रवानगी झाली आहे.
या आंदोलनासाठी महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटने कडून जाहीर पाठिंबा दिला गेला आहे. 14 ऑक्टोबर 2024 च्या शासन निर्णयानुसार अनुदानाचा निधी त्वरित उपलब्ध करून राज्यातील शिक्षकांना दिलासा द्यावा ही प्रमुख मागणी या आंदोलनाद्वारे केली जात आहे.