प्रशासनाने पुढील वर्षी इंदापूर मध्ये ज्या भागात दिंड्या जास्त असतात त्या भागात सुख सोयींची उपलब्धता करावी - अनिताताई खरात यांची प्रशासनाला विनंती.
तेजपृथ्वी ग्रुपच्या वतीने संत तुकाराम महाराज पालखी सोहळा आगमनावेळी इंदापूर नजिक चहा वाटप.
इंदापूर : जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात भाविक भक्तांना इंदापूर येथे आगमना दिवसी तेजपृथ्वी ग्रुपच्या वतीने चहा वाटप करण्यात आले. गेले पाच ते सहा वर्षांपासून तेजपृथ्वी ग्रुपच्या वतीने दरवर्षी भाविकांना कधी पोहे,केळी ,चहा बिस्किट ,उपमा ,पाणी बॉटल अशी वेगवेगळ्या प्रकारचे भाविकांच्या सेवेसाठी वाटप करण्यात येते
. यावेळी तेजपृथ्वी ग्रुपच्या वतीने सर्व पदाधिकाऱ्यांनी मिळून चहा वाटप अंदाजे 2000 चहा चे वाटप करण्यात आले .
यावेळी तेजपृथ्वी ग्रुपचे अध्यक्ष अनिताताई खरात यांनी तेजपृथ्वीचे सर्वच पदाधिकारी हे अतिशय मनोभावाने प्रत्येक वर्षी वारकऱ्यांच्या सेवेसाठी काहीतरी उपक्रम राबवतात. त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार मानून कौतुक केले. यावर्षी सद्दामभाई बागवान, आबा ठावरे, लक्ष्मण वाघमोडे, शंकर उबाळे, विशाल म्हेत्रे, संदीप रेडके,पृथ्वीराज खरात,नागेश मारकड, मयुर बिचकुले,रुपेश वाघमोडे इत्यादी पदाधिकारी यांनी चहा वाटप केला .
तसेच पुढे खरात म्हणाल्या मी प्रशासनालाही विनंती करते की बऱ्याच ठिकाणी वारकऱ्यांच्या सोयीसाठी जे पाण्याचे टॅंकर किंवा टॉयलेटची सोय,किंवा पालखी येण्याच्या अगोदर होणारे रस्ता मुरूमीकरण हे नको त्या ठिकाणी असते. आणि ज्या ठिकाणी पाहिजे त्या ठिकाणी ते होत नाही.तरी पुढच्या वर्षी प्रशासनाने कोणत्या भागात जास्त दिंड्या आहेत. त्या भागात टॉयलेट,पाणी टँकर किंवा इतर शासनामार्फत देणाऱ्या सुख सोयी उपलब्ध करून द्यावेत. तेजपृथ्वी ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना तशी कल्पना दिली परंतु अधिकाऱ्याने सांगितलं की, आमचे पहिलेच लोकेशन फिक्स आहे. मला वाटतं तुमच्या लोकेशन पेक्षा वारकऱ्यांची सोय कशी होईल. त्याप्रमाणे नियोजन करावे अशी प्रशासनाला विनंती अनिता खरात यांनी केली.