शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)
सामाजिक बातमी
न्याहाळोद : गावात सेवानिवृत्त सैनिक गौरव रामचंद्र रोकडे यांचा सत्कार करण्यात आला. गावात ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली . ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले.
भारतीय सैन्य दलातून सेवा देऊन सेवानिवृत्त झालेल्या सैनिकाचा सत्कार करण्यात आला. गावातील नागरिकांनी त्यांचे स्वागत केले आणि गावातून मिरवणूक काढून घरोघरी औक्षण करण्यात आले. मिरवणुकीत सेवानिवृत्त सैनिकाचा फौजफाटा सोबत होता.
गावातून मिरवणूक:सेवानिवृत्त सैनिकाच्या स्वागतासाठी गावातून मिरवणूक काढण्यात आली, ज्यामध्ये ढोल-ताशांचा गजर आणि बँड पथकाचा समावेश होता.ग्रामस्थांचा उत्साह:गावकऱ्यांनी मोठ्या उत्साहाने या कार्यक्रमात सहभाग घेतला आणि सैनिकाला शुभेच्छा दिल्या.
अदराची भावना: गावातील नागरिकांनी सेवानिवृत्त सैनिकाबद्दल आदर व्यक्त केला आणि त्यांच्या देशसेवेचा गौरव केला. विविध मान्यवरांनी गौरव बद्दल गुण गायले.
सत्कार समारंभ:समारंभादरम्यान, सैनिकाचे आई वडील व सपत्नीक सत्कार करण्यात आला आणि त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. मिरवणुकीची सांगता झाल्यावर माळी मळी येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी लोकनियुक्त सरपंच कविता वाघ या होत्या प्रमुख पाहुणे म्हणून भाजप जिल्हा अध्यक्ष बापू खलाणे, प्रा. अरविंद जाधव, नूतन विद्यालय चे अध्यक्ष दिलीपभाऊ उपाध्ये, भाजपाचे भाऊसाहेब देसले, गटप्रमुख प्रकाश वाघ, पंचायत समिती सदस्य योगराज पवार, सामाजिक कार्यकर्ते अशोक वाघ, माजी पंचायत समिती सदस्य मुकेश पवार, विकास पवार , भैय्या कढरे, भगवान बाविस्कर, सुनील पुराणिक, निलेश माळी, ज्ञानेश्वर रोकडे,आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते