shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

📰 ऊर्जा विभागातील भ्रष्टाचाराचे जाळे उघड – बोगस लिफ्ट परवाने देण्याचा घोटाळा उघडकीस

मुंबई/पुणे – मुख्य विद्युत निरीक्षक व उदवाहन निरीक्षक यांनी संगनमताने दिलेले खोटे, बोगस परवाने, परवानग्या व प्रमाणपत्रे उघडकीस येऊनही ऊर्जा विभागाने त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा गंभीर आरोप होत आहे.

पुण्यातील खराडी स.नं. 40 हिस्सा 1बी येथील इमारतीत एकूण 18 लिफ्टला (16 पॅसेंजर + 2 सर्व्हिस लिफ्ट) मुख्य विद्युत निरीक्षक, मुंबई यांनी 20 जून 2024 रोजी परवानगी दिली होती. परंतु पुणे महानगरपालिकेच्या शहर अभियंता कार्यालयाने 25 मे 2025 रोजी केलेल्या प्रत्यक्ष पाहणीअंती फक्त 8 उदवाहनेही बसविण्यात आलेली नसल्याचे फोटोसहित नोंदवले आहे.


या धक्कादायक घोटाळ्याची बातमी दैनिक सकाळ, पुणे मध्ये 24 ऑगस्ट 2024 व 20 सप्टेंबर 2024 रोजी प्रसिद्ध झाली होती. यामध्ये ऊर्जा विभागाचे उपसचिव कराड यांचे बाईटही छापले गेले होते. तसेच विविध तक्रारी ऊर्जा विभागाला प्राप्त झाल्या, पण तपास, चौकशी व दोषींवर कारवाई करण्याऐवजी संपूर्ण प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप आहे.

हे प्रकरण उघड झाल्यानंतरही संबंधित अधिकारी जागेवर न जाता भ्रष्टाचारातून बोगस परवाने देत असल्याचे स्पष्ट होत असून, ऊर्जाविभागाकडून मुद्दामच दुर्लक्ष केले जात आहे.

आता या घोटाळ्यावर तात्काळ चौकशी, दोषी अधिकाऱ्यांना चौकशीपर्यंत सक्तीच्या रजेवर पाठवणे व कठोर प्रशासकीय कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

📌 पावसाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित होणार
या गंभीर प्रकरणावर आमदार भाई जगताप पावसाळी अधिवेशन 2025 मध्ये विधानसभेत प्रश्न उपस्थित करणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे ऊर्जा विभागातील भ्रष्टाचाराचा मुद्दा चांगलाच गाजण्याची शक्यता आहे.

📢 लोकांची मागणी
या प्रकरणात सामील असलेल्या सर्व अधिकाऱ्यांची चौकशी, त्यांना निलंबित करण्याची मागणी होत असून, सरकारने हा घोटाळा लपवण्याऐवजी पारदर्शक तपास करावा, अन्यथा तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

close