एरंडोल प्रतिनिधी :- एरंडोल पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या खून व अपघाताचा बनाव या दोन गंभीर गुन्ह्यांचा यशस्वी छडा लावून आरोपीला अटक केल्याबद्दल पोलीस उपनिरीक्षक श्री. शरद बागल यांचा जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.श्री.महेश्वर रेड्डी यांच्या हस्ते प्रशंसापत्र देऊन सत्कार करण्यात आला.
या गौरवप्रसंगी बागल सरांच्या कार्याची पोलीस अधीक्षकांनी स्तुती केली आणि त्यांच्या मेहनतीचे कौतुक केले.