shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

दत्तात्रय शिर्के यांच्या वतीने जि. प. प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना मोफत स्पोर्ट ड्रेस चे वाटप.

दत्तात्रय शिर्के यांच्या वतीने जि. प. प्राथमिक शाळेच्या  विद्यार्थ्यांना मोफत स्पोर्ट ड्रेस चे वाटप.
इंदापूर : वडापुरी (ता. इंदापूर) शनिवार (दि. 12 जुलै) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रामवाडी - वडापुरी येथे दत्तात्रय शिर्के नीरा - भीमा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक यांच्याकडून शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मोफत स्पोर्ट ड्रेस चे वाटप करण्यात आले. 

 सदर कार्यक्रमासाठी रामवाडी गावचे अशोक  फडतरे (माजी सरपंच), शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. शुभांगी पवार, उपाध्यक्ष  संतोष काळे, डॉ.दिग्विजय फडतरे, विश्वनाथ पवार, सचिन पवार,  आण्‍णासो फडतरे, अंगणवाडी सेविका सौ. पवार मॅडम, सौ.फडतरे मॅडम तसेच शिक्षक उपस्थित होते.
-------------------
फोटो ओळ : जि प. प्राथमिक शाळा रामवाडी - वडापुरी येथे दत्तात्रय शिर्के यांच्याकडून शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मोफत स्पोर्ट ड्रेस चे वाटप करण्यात आले.
close