बावडा येथे परतीच्या प्रवासात संत तुकाराम महाराज पालखीचे स्वागत.
इंदापूर : जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा परतीच्या प्रवासात बावडा येथे दि. 12 रोजी दुपारी 2 वाजता तोफांच्या सलामीने स्वागत करण्यात आले यावेळी जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे विश्वस्त . ह.भ.प .भानुदास मोरे महाराज यांचा सत्कार सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील साखर कारखान्याचे मा. संचालक महादेवराव घाडगे यांनी बावडा ग्रामस्थांच्या वतीने केला. या प्रसंगी शंकर घाडगे, अंकुश घाडगे, रणजित घाडगे, सदाशिव कदम,सचिन सावंत, विकास धायगुडे, नागेश गायकवाड, शरद गायकवाड, अनिल कांबळे, दादा डाळिंबे, अभिजित चव्हाण, सुयश लोखंडे, अजिंक्य जगताप, इत्यादी उपस्थित होते. अशी माहिती अंकुश घाडगे यांनी दिली.