shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

गुरुपौर्णिमा निमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबीरात शेकडो गरजूंनी घेतला लाभ


गुरुपौर्णिमा निमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबीरात शेकडो गरजूंनी घेतला लाभ

गुरुपौर्णिमा निमित्ताने श्री गुरुदेव दत्त संस्थान व ग्रुप ग्रामपंचायत पिंपळे खुर्द स्तुत्य उपक्रम...

अमळनेर : धार्मिकतेसोबतच सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असलेल्या श्री गुरुदेव दत्त संस्थेतर्फे बालरोगतज्ञ व डेंटल सर्जन यांचे आजार असणाऱ्या रुग्णांसाठी 10 रोजी मोफत तपासणी व मार्गदर्शन गुड्या व औषधी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरात गावातील व परिसरातील शेकडो गरुजूंनी लाभ घेतला.

    श्री गुरुदेव दत्त संस्थेचे अध्यक्ष निंबा ज्याला चौधरी व ग्रुप ग्रामपंचायत पिंपरी खुर्द प्रथम लोकनियुक्त महिला सरपंच सौ वर्ष युवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाने दत्त मंदिर परिसरात आयोजित या शिबीरात अमळनेर येथील नवजात शिशु व बालरोग तज्ञ डॉ. राजेंद्र ठाकरे ,डेंटल सर्जन डॉ श्वेता ठाकरे रुग्णांची मोफत तपासणी करुन मार्गदर्शन केले. 

वेलनेस फोरएव्हर मेडिकल यांच्यामार्फत रुग्णांना गोड्या व औषधी यांचे सहकार्य लाभले. या शिबिरात पिंपळे सह चिमनपुरी पिंपळे खु पिंपळे बुद्रुक आदी भागातील गरजूंनी लाभ घेतला.

    यशस्वीतेसाठी श्री गुरुदेव दत्त संस्थान मंडळासह ग्रुप ग्रामपंचायत व ग्रामस्थ निंबा बापू चौधरी सा सामाजिक कार्यकर्ते युवराज पाटील पुरुषोत्तम लोटन चौधरी ग्रामपंचायत सदस्य संतोष चौधरी गोकुळ पाटील यांचे अनमोल सहकार्य लाभले.

close