shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अमळनेरात पालिकेच्या वाढीव घरपट्टी संदर्भात रविवार सहविचार सभा.

अमळनेरात पालिकेच्या वाढीव घरपट्टी संदर्भात रविवार सहविचार सभा.

अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघाच्या वतीने उपस्थितीचे आवाहन.

अमळनेर-येथील नगरपरिषदेने एका खाजगी संस्थेने केलेल्या सर्वेनुसार शहरातील घरपट्टी व दुकान भाडे करात मोठ्या प्रमाणात वाढ केल्याने यासंदर्भात नागरिकात नाराजीचा सूर असल्याने यासंदर्भात विविध संघटना,लोकप्रतिनिधी आणि नागरिकांची मते जाणून घेण्यासाठी आणि पुढील दिशा ठरविण्यासाठी सहविचार सभेचे आयोजन उद्या रविवार दिनांक 13 जुलै रोजी करण्यात आले आहे.

       सदर सभा सकाळी 10.30 वाजता श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यान,न्यू प्लॉट,अमळनेर येथे होणार आहे.अमळनेर नगरपरिषदेने गेल्या वर्षी शहर हद्दीतील घरपट्टी करात बदल करण्यासाठी बाहेर गावातील एका खाजगी संस्थेला मोठा मोबदला देऊन घरांची मोजणी करण्याचे काम दिले आहे,सदर संस्थेने मोजणी करून अहवाल पालिकेला सुपूर्द केल्यानंतर पालिकेने घरपट्टी करात मोठया प्रमाणात वाढ करून त्यासंदर्भातील बिले नागरिकांना देणे सुरू केले आहे.एकदम मोठ्या रकमेची बिले हातात पडल्याने अनेकांना धडकी भरत असून यामुळे अवाजवी वाढ केल्याची भावना नागरिकांच्या मनात निर्माण झाली आहे.पालिकेने ही वाढ कोणत्या निर्देशानुसार केली यासंदर्भात कोणताही खुलासा पालिकेने केलेला नसून इतर शहराच्या मानाने ही वाढ अन्यायकारक असल्याचा सूर नागरिकांत आहे.तसेच सदर सर्व्हे पालिका कर्मचाऱ्यांकडून न करता मोबदला देऊन खाजगी संस्थेकडून केल्याने याबाबतही नागरिकांत आश्चर्य व्यक्त होत आहे. तसेच गेल्या काही वर्षांपासून पालिकेत कोणीही लोकप्रतिनिधी किंवा कौन्सिल अस्तित्वात नसल्याने प्रशासकांनी एकतर्फी निर्णय घेऊन ही वाढ केल्याची ओरड व्यापारी बांधव करीत आहेत.यासंदर्भात शहरात जनप्रक्षोभ होऊ नये यासाठी पालिकेने ज्या नागरिकांना घरपट्टी वाढून आली आहे अशा सर्वांनी हरकतीचे अर्ज नगरपालिकेतून घेऊन हरकती नोंदवाव्यात, तरच वाढीव घरपट्टी काही प्रमाणात कमी होईल आणि जो हरकती घेणार नाही त्याची घरपट्टी कमी होणार नाही अशी भूमिका घेतल्याचे बोलले जात आहे.

        यासंदर्भात सर्व संघटना,राजकीय पक्ष त्यांचे प्रतिनिधी आणि कार्यकर्ते यांना त्यांची स्पष्ट भूमिका मांडता यावी यासाठी सर्वाना एकाच व्यासपीठावर आणले जात असून यासाठी अमळनेर शहर व पत्रकार संघाने पुढाकार घेतला आहे.या सहविचार सभेत पुढील दिशा ठरविण्यात येणार असून त्यानंतर स्थानिक लोकप्रतिनिधी माननीय आमदार,माननीय खासदार यांची भेट घेऊन निवेदन स्वरूपात जनतेच्या भावना त्यांच्या पर्यंत पोहोचविल्या जाणार आहेत. तरी या महत्वपूर्ण सभेस शहरातील सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी,विविध सामाजिक संस्था आणि व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी, बांधकाम व्यावसायिक,व्यापारी बांधव,पत्रकार बांधव आणि सर्वपक्षीय नागरिकांनी अवश्य उपस्थिती द्यावी असे आवाहन अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघाने केले आहे.

close