अमळनेर-गुरूपौर्णिमा निमित्त असंख्य युवा कार्यकर्त्यांनी माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेऊन वंदन करत शुभेच्छा दिल्या.
गुरू पौर्णिमेला आपले आईवडील,साधू संत गुरू समान मार्गदर्शक,शिक्षक आदी व्यक्तींना वंदन केले जात असते,याच अनुषंगाने अमळनेर तालुक्यातील असंख्य युवकांनी आपले मार्गदर्शक व आधारस्तंभ आमदार अनिल पाटील यांच्या निवासस्थानी गर्दी करून वंदन करत शुभेच्छा दिल्यात.यावेळी आमदार पाटील यांनी त्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्यानंतर आई वडिलांची सेवा करा, सर्व वडीलधाऱ्या मंडळींचा सन्मान राखा, आपले कुटुंब आणि आरोग्य सांभाळून मेहनत व जिद्दीने खूप मोठे आणि यशस्वी व्हा असा मौलिक सल्ला दिला.