shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वडार समाजाच्या आर्थिक न्यायाची पायमल्ली! फडणवीस सरकारचा निर्णय फक्त कागदावरच?

लातूर, प्रतिनिधी

भाजप सरकारने वडार समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी कै. पै. मारुती चव्हाण वडार आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याचा शासन निर्णय एक वर्षापूर्वी जाहीर केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली हा निर्णय वडार समाजाच्या उन्नतीसाठी ऐतिहासिक पाऊल ठरणार होता, अशी आशा होती. मात्र, प्रत्यक्षात आजपर्यंत या महामंडळाच्या माध्यमातून वडार समाजातील एकाही युवकाला कर्ज, मदत किंवा आर्थिक आधार मिळालेला नाही ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे.



शासननिर्णय होऊनही त्याची अंमलबजावणी न होणे ही वडार समाजाची फसवणूक आहे. या महामंडळासाठी निधी वाटप, कर्ज प्रक्रिया राबवणे हे सर्व विषय ठप्प आहेत. वडार समाजाचे तरुण शिक्षित होत असूनही आर्थिक दुर्बलतेमुळे व्यवसाय किंवा स्वयंरोजगार सुरू करू शकत नाहीत.

या संदर्भात वडार समाज संघटना, सामाजिक कार्यकर्ते आणि युवकांनी भाजप सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली असून, सरकारचा तीव्र निषेध करण्यात येत आहे. शासन जर लवकरात लवकर महामंडळाच्या माध्यमातून वास्तविक आर्थिक मदत पुरवली नाही, तर वडार समाजात तीव्र असंतोष उसळेल आणि रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याशिवाय पर्याय उरणार नाही.

🛑 वडार समाजाचा सवाल – शासननिर्णय केवळ मतांसाठी? की समाजाशी फसवणूक?
सरकारने याचे उत्तर द्यावे. समाजाच्या भावनांशी खेळू नये.

🗣️ महामंडळ तयार करूनही जर तो निष्क्रिय राहणार असेल, तर हे सरकार वडार समाजाचा केवळ वापर करत आहे.” — समाज प्रतिनिधींचा रोष


📝 संपर्कासाठी:
श्रीकांत मुद्दे सर
प्रदेश ृ, वडार समाज संघ, महाराष्ट्र राज्य 
मु. पो. देहरे, ता., जि.लातूर



close