अमळनेर:- तालुक्यातील चिमणपुरी पिंपळे परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ घातला परिसरात अनेक छोट्या मोठ्या चोऱ्या होत असल्याने ह्या भुरट्या चोरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.
राजेंद्र मन्साराम पाटील यांच्या पिंपळे खु. शिवारातील शेतातील विहिरीवर लावलेली ४५०० हजार रुपये किमतीची टेक्स्मो कंपनीची मोटार अज्ञात चोरट्याने लंपास केल्याचे २२ जून रोजी उघडकीस आले. तसेच पिंपळे खु. मनोहर दिलीप चौधरी यांची रिक्षा सार्वजनिक जागी लावली असताना रिक्षाची बॅटरी लंपास करण्यात आली. तसेच ग्रामपंचायतीची बोअरवेलची ५०० फूट वायर अज्ञात चोरट्याने चोरून नेली. अश्या अनेक छोट्या मोठ्या चोऱ्या परिसरात नेहमीच होत असून या भुरट्या चोरट्यांचा पोलिसांनी बंदोबस्त करावा अशी मागणी पिंपळे ग्रामस्थांनी केली आहे.