अहिल्यानगर प्रतिनिधी | शिर्डी एक्स्प्रेस वृत्तसेवा
भारतीय सैन्यात प्रथम श्रेणी राजपत्रित अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या आणि लातूर जिल्ह्याचे अभिमान असलेल्या कर्नल ऋषिकेश भानुदासराव धोत्रे साहेब यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शिर्डी एक्स्प्रेस वृत्तसेवा परिवारातर्फे व १६व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.
कर्नल धोत्रे यांचे शौर्य, देशसेवा आणि समाजसेवा यांचा संगम आजच्या तरुणांसाठी एक प्रेरणादायी आदर्श आहे. सियाचीनच्या भीषण थंडीपासून काश्मीरमधील दहशतवादविरोधी मोहिमांमध्ये दिलेलं योगदान, तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर कांगो देशामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी केलेली कर्तव्यनिष्ठ सेवा, हे त्यांचे कार्य खऱ्या अर्थाने देशसेवेचे सर्वोच्च उदाहरण आहे.
केवळ रणभूमीवरच नव्हे, तर सामाजिक क्षेत्रातही कर्नल धोत्रे यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करणे, तरुणांना योग्य दिशा देणे आणि समाजात ऐक्य निर्माण करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहणे, ही त्यांची कार्यशैली समाजासाठी आदर्शवत आहे.
त्यांच्या कार्यातून देशातील तरुणांना प्रेरणा मिळते असून, समाजासाठी आणि देशासाठी त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शिर्डी एक्स्प्रेस वृत्तसेवा परिवार परमेश्वरचरणी प्रार्थना करतो की, त्यांना उत्तम आरोग्य, यश आणि सुख-समृद्धी लाभो.
कर्नल ऋषिकेश धोत्रे साहेब हे पुढेही समाजासाठी आणि देशासाठी प्रेरणास्तंभ ठरावेत, हीच त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!