shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी – बालशिवाजी प्राथमिक विद्यालयात वक्तृत्व स्पर्धा व अभिवादन कार्यक्रम.

लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी – बालशिवाजी प्राथमिक विद्यालयात वक्तृत्व स्पर्धा व अभिवादन कार्यक्रम.

एरंडोल (प्रतिनिधी) –
दि. 01 ऑगस्ट 2025 रोजी बालशिवाजी प्राथमिक विद्यामंदिर, एरंडोल येथे थोर स्वातंत्र्यसेनानी लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीचे व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे औचित्य साधून अभिवादन व प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. संगिता वाघ मॅडम यांनी भूषविले. त्यांच्याच हस्ते लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

या कार्यक्रमात विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्यावर प्रभावी भाषणे सादर केली. स्पर्धेत सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात आली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. मंगला पाटील यांनी तर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या कार्यावर मार्गदर्शन सौ. दिपाली जाधव व सौ. नलिनी भावसार यांनी केले.

कार्यक्रमास पालकांची उपस्थिती लाभली. यशस्वी आयोजनासाठी सर्व शिक्षकवृंदांनी सक्रिय सहभाग घेतला. आभारप्रदर्शन श्री. हेमराज बडगुजर यांनी केले.



close