शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)
धार्मिक बातमी
सदगुरू योगीराज गंगागिरी महाराज यांनी सुरु केलेली पाऊणे दोनशे वर्षाची सप्ताहाची परंपरा पत्रकारांच्या योगदानातून सर्वदुर पसरली आहे. त्यामुळे पत्रकारांचा सन्मान हा उचित कार्यक्रम आहे. असे गौरवदगार सरला बेटाचे मठाधीपती महंत रामगिरी महाराज यांनी व्यक्त केले.
शनी देवगाव (ता.वैजापुर) येथे श्री सद्गुरू योगीराज गंगागिरी महाराज यांच्या १७८ व्या अखंड हरिनाम सप्ताह मध्ये सुंदर वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांचा सन्मान सोहळा महाराष्ट्र मराठी पत्रकार संघाचे वतीने महंत रामगिरी महाराज यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे, छत्रपती संभाजी नगर जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व आरोग्य सभापती अविनाश पाटिल गलांडे, मधूकर महाराज, मराठवाडा विभाग प्रमुख कुंडलिक वाळेकर, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख भाऊसाहेब वाकचौरे जिल्हा सरचिटणीस चंद्रकांत झुरंगे, अकोले तालुकाध्यक्ष अशोक उगले यांच्या उपस्थित संपन्न झाला.
यावेळी सुंदर वार्तांकन केल्याबद्दल भाऊसाहेब आनंदा काळे ( दै. सार्वमत ), काकासाहेब पडवळ ( दै. पुण्यनगरी ), राजेन्द्र बाबुराव देसाई ( दै. समर्थ गांवकरी ), कमलाकर रासने (दै. सकाळ) नंदु निकम, गोरख पवार ( दै. मराठवाडा साथी), रविंद्र पवार (सुदर्शन न्युज चँनल) या पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. मानपत्र, सन्मान चिन्ह, मानाची सप्ताह ची शाल, घड्याळ देऊन सन्मानित करण्यात आले.
महंत रामगिरी महाराज बोलताना म्हणाले की, सरला बेट ही भक्तीचे स्थान असून त्याची महती व सप्ताहाची प्रसिद्धी पत्रकार करत असतात. "लेने को हरीनाम, करने को अन्नदान " अशी या सप्ताहाची परंपरा आहे. त्याला पत्रकार यांनी कायम प्रसिद्धी दिली आहे.
डॉ. विश्वासराव आरोटे म्हणाले की, विश्वात सर्वात मोठा अखंड हरिनाम सप्ताह होतो. सद्गुरू योगीराज गंगागीरी महाराज, गुरुवर्य नारायणगिरी महाराज यांची अनेक वर्षाची परंपरा पुढे नेत असताना महंत रामगिरी महाराज यांचे कार्य अतुलनीय आहे. सनातन हिंदू धर्मासाठी त्यांनी आपले जीवन वाहून घेतले आहे. या सप्ताहाचे बातमी करतात त्यांना शाबासकी देण्याचे काम पत्रकार संघाची जबाबदारी आहे त्यामुळे या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
प्रास्तविक कुंडलिक वाळेकर यांनी तर सूत्रसंचालन दत्तु खपके पाटिल यांनी केले. तर आभार भाऊसाहेब वाकचौरे यांनी मानले.