शिर्डी प्रतिनिधी: ( संजय महाजन)
सामाजिक बातमी
विद्या प्रसारिणी सभेच्या व्ही.पी.एस हायस्कूल व द.पू. मेहता कनिष्ठ महाविद्यालयामध्ये रक्षाबंधन उत्सव साजरा करण्यात आला.
प्रशालेचे प्राचार्य श्री.सुहास विसाळ, उपमुख्याध्यापक श्री. विजय रसाळ, उपप्राचार्य श्री.आदिनाथ दहिफळे, पर्यवेक्षक श्री.श्रीनिवास गजेंद्रगडकर, श्री.अनिल खामकर, पर्यवेक्षिका श्रीमती अक्षता पाध्ये यांनी रक्षाबंधनानिमित्त शुभेच्छा दिल्या.
रक्षाबंधन बहिण आणि भाऊ यांच्या पवित्र नात्याचा एक महत्वाचा उत्सव मानला जातो. शाळेमध्ये देखील विद्यार्थिनींनी विद्यार्थ्यांना राख्या बांधून हा पवित्र सण अतिशय प्रेमाने साजरा करण्यात आला. सकाळ सत्रामध्ये कनिष्ठ महाविद्यालया मध्ये तसेच दुपार सत्रामधील हायस्कूल विभागांमध्ये रक्षाबंधन साजरे करण्यात आले. शाळेतर्फे रक्षाबंधन साजरे करण्यासाठी राख्यांची व्यवस्था प्रशालेकडून करण्यात आली.
वर्गा-वर्गामध्ये विद्यार्थिनींनी विद्यार्थ्यांना राख्या बांधून रक्षाबंधन उत्सव साजरा करण्यात आला. वर्गशिक्षकांनी विद्यार्थ्यांना रक्षाबंधनाचे महत्त्व सांगितले तसेच विद्यार्थ्यांनी गाणे सादर करून रक्षाबंधनाचे महत्त्व सांगितले.
प्रशालेतील शिक्षिकांनी शिक्षक बंधूंना राख्या बांधून रक्षाबंधन उत्सव साजरा केला. सांस्कृतिक समिती प्रमुख श्री. धनंजय काळे आणि श्री.योगेश कोठावदे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.
नियामक मंडळ अध्यक्षा डॉ.मृणालिनी गरवारे, कार्यवाह डॉ.सतीश गवळी, सहकार्यवाह श्री.विजयजी भुरके, नियामक मंडळ सदस्य तथा शाला समिती अध्यक्ष श्री.भगवानभाऊ आंबेकर यांनी प्रशालेतील शिक्षक बंधू-भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना रक्षाबंधन निमित्त शुभेच्छा दिल्या.