shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

क.जे. सोमैया हायस्कूल मध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती मोठ्या उत्साहात साजरी.

श्रीरामपूर (प्रतिनिधी ):- हिंद सेवा मंडळाच्या क.जे. सोमैया हायस्कूल मध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथी, अण्णा भाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली. विद्यालयाचे मुख्याध्यापक भूषण गोपाळे, पर्यवेक्षक कल्याण लकडे, उर्मिला कसार, बाबा वाघ यांच्या हस्ते लोकमान्य टिळक, अण्णा भाऊ साठे प्रतिमेला पुष्पहार आर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उर्मिला कसार होत्या. लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णा भाऊ साठे जयंती निमित विद्यालयात वकृत्व स्पर्धा आयोजित केली होती.



 इ. ५ वी ते इ.७ वी, इ. ८ वी ते इ . १०वी या दोन गटात झालेल्या वकृत्व स्पर्धेत विद्यार्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. विद्यार्थांनी हिंदी, इंग्रजी, मातृभाषेतून आपले मनोगत सादर केली. इ.५ वी ते इ . ७वी गटातुन प्रथम क्रमांक चि . तेजस पांडुरंग उबाळे. द्वितीय क्रमांक चि. वंश सचिन तिवार. तृतिय क्रमांक चि. तक्षक दिलीप दाभाडे. इ .८ वी ते इ .१० वी गटातुन तीन कमांक काढण्यात आले. प्रथम चि. आर्यन विजय घुले. द्वितीय चि. श्रीकृष्ण विठ्ठल वाघमोडे. तृतिय चि वल्लभ संजय भुजाडी. या विजेत्या स्पर्धकांना परितोषिक देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीराम कुलकर्णी, सुत्रसंचालन रुपाली केवल यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्मिता पुजारी, ज्योती फुलवर, शरयू यरगट्टीकर, विनायक चितळकर, संकेत गंधे यांसह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी प्रयत्नशील होते .
close