श्रीरामपूर / प्रतिनिधी:
येथील विन्सेन्शन मिशन सर्विस सोसायटी संचलित डि पॉल इंग्लिश मिडीयम हायस्कूलमध्ये नुकताच देशाचा ७९ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मेजर कृष्णा दलपत सरदार सुभेदार होते. यावेळी झेंडावंदन झाल्यावर त्यांनी विद्यार्थ्यांसमोर स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व विशद केले.
व राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला. तसेच सेंटलूक हॉस्पिटलच्या विद्यमान व्यवस्थापिका सि.फ्रँकलिन रामा यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
दरम्यान इ.पाचवीतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर नृत्य व गीते सादर करत उपस्थितांची मने जिंकली. तसेच यावेळी मागील शैक्षणिक वर्षातील विविध उपक्रमात यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. दरम्यान इयत्ता पहिली ते दहावीतील विद्यार्थ्यांची फलक सजावट स्पर्धा घेण्यात आली. प्रसंगी कार्यक्रम यशस्वीतेसाठी वर्गशिक्षिका मालन मोहन, माधुरी महाडीक यांनी कठोर परिश्रम घेतले.
यावेळी कार्यक्रमास संस्थेचे व्यवस्थापक फादर सिजो, प्रशासक फा.फ्रँको, प्राचार्या सिस्टर ब्लेसा, समन्वयक सि. रेन्नी,सचिव मॉली कुथूर, वरिष्ठ लिपिक रवी लोंढे, गणेश पवार, विकास वाघमारे, संदीप निबे, सोनल झांजरी, अनिता पवार तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदींनी शुभेच्छा दिल्या. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार संजय खेमनर यांनी केले.
*वृत्त विशेष सहयोग*
पत्रकार दिपक कदम, श्रीरामपूर
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111