shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

प्राईडचा वटवृक्ष दिवसेंदिवस असाचबहरत राहावा - दिपालीताई ससाणे

श्रीरामपूर / प्रतिनिधी:
श्रीरामपूर पंचायत समितीच्या माजी सभापती व प्राईडच्या संस्थापिका डॉ. वंदनाताई मुरकुटे आणी माऊली प्रतिष्ठानचे संस्थापक ज्ञानेश्वर (माऊली) मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली भेर्डापूर - वांगी येथे सुरु असलेल्या प्राईड ॲकेडमी इंग्लिश मेडीयम स्कूल ॲन्ड ज्युनि. मध्ये आज प्राईड ॲकेडमीमध्ये ७९ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. 
 भारतीय युवक कॉग्रेसच्या सचिव तसेच आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ. दिपालीताई ससाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष लकी शेठी, अशोकनगर येथील डॉ. सारिकाताई कुंदे, भेर्डापूर च्या  डॉ. माया कवडे, सौ. त्रिवेणी गोसावी आदी मान्यवर, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


 शासनाने जारी केलेल्या नियमांचे पालन करत देशभक्तीपर गाण्यावर मुलांनी कवायत प्रकार सादर केले. विद्यार्थ्यांनी पथ संचलन करून ध्वजाला सलामी दिली. लहान मुलांनी देशभक्तीपर भाषणे केली.  
 मी १० वर्षापूर्वी पाहिलेला प्राईडचा हा वटवृक्ष बहरला आहे. या वृक्षाला शाखा आल्या आहेत. दिवसेंदिवस हा वटवृक्ष असाच बहरत राहावो यातून आयपीएस, इंजिनिअर, मोठे अधिकारी घडतील याची मला खात्री आहे, असे प्रतिपादन दिपालीताई ससाणे यांनी केले .
यावेळी डॉ.कुंदे म्हणाल्या की ग्रामीण भागात डॉ. वंदनाताई मुरकुटे यांच्यामुळे  दिले जाणारे आदर्शवादी व दर्जेदार शिक्षणाचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती ही वाखाणण्याजोगी आहे.  
तसेच लकी सेठी यांनी शाळेच्या कामाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.

 शाळा स्तरावर झालेल्या निवडणुकीतील विजयी उमेदवारांना मान्यवरांच्या हस्ते बॅजेस वितरण करून त्यांचा शपथग्रहण विधी पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या विद्यार्थीनी अदिती हापसे व तेजल निर्मळ यांनी केले. शाळेचे क्रीडा शिक्षक प्रदीप गोराणे यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले. विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्राचार्या प्रीती गोटे व सर्व शिक्षक तसेच कर्मचारी यांचे मोलाचे योगदान लाभले.

*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस
 श्रीरामपूर - 9561174111
close