अहिल्यानगर प्रतिनिधी
अहिल्यानगर जिल्हा परिषदेतील काही अधिकारी-कर्मचारी कार्यालयात हजेरीपेक्षा वसूलीत जास्त व्यस्त असल्याच्या तक्रारींवर प्रशासनाने शेवटी कारवाईचा बडगा उगारला आहे.
सामाजिक कार्यकर्ते दीपक पाचपुते यांनी दाखल केलेल्या तक्रारीची गंभीर दखल घेत उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेळके यांनी सर्व गटविकास अधिकारी व विभागप्रमुखांना लेखी आदेश बजावले आहेत.
दैनंदिनी उशिरा? मग पगार थांबेल!
आदेशपत्रानुसार सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी दरमहा दैनंदिनी व उपस्थिती अहवाल वेळेत सादर करणे बंधनकारक आहे. यामध्ये टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांचे वेतन थेट अडवले जाणार आहे.
💰 "वसूलीबहाद्दर" आता सावध!
गावागावात विकासकामांवर लक्ष न देता फक्त वसूली बहाद्दरगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांना व कर्मचारी यांना या कारवाईने धसका बसणार आहे. लोकांचे प्रश्न सोडवण्याऐवजी हुजरेगिरीत आणि कमिशनखोरीत रमलेल्या अधिकाऱ्यांना व कर्मचारी यांना यानंतर प्रशासन उघडपणे जबाबदार धरणार आहे.
लोकांची अपेक्षा – आदेश हवेत नाही, कृती जमिनीवर!
सामान्य जनतेची स्पष्ट मागणी आहे – फक्त आदेश नव्हेत, तर प्रत्यक्ष अंमलबजावणी दिसली पाहिजे. वसूलीखोर अधिकारी घरबसल्या पगार घेत बसले, आणि सामान्य नागरिक मात्र सेवेसाठी भटकत राहिले, अशी परिस्थिती थांबवणे हीच खरी कसोटी ठरणार आहे.
👉 या कारवाईनंतर झेडपी कार्यालयातील "नियमांचे उल्लंघन करणाऱ्या" अधिकाऱ्यांना धडा शिकवला जाईल का, हे पाहणे आता जिल्हावासियांच्या डोळ्यातील मोठं प्रश्नचिन्ह आहे.
००००