shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

भरधाव एस.टी.बसचा भीषण अपघात: १ ठार, १५ गंभीर जखमी; ५० हून अधिक प्रवासी जखमी.

भरधाव एस.टी.बसचा भीषण अपघात: १ ठार, १५ गंभीर जखमी; ५० हून अधिक प्रवासी जखमी.

एरंडोल, १ ऑगस्ट:
भडगाव-एरंडोल मार्गावरील नायरा पेट्रोल पंपाजवळ शुक्रवारी सकाळी ११.१५ वाजता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसचा भीषण अपघात झाला. एमएच २० बीएल ३४०२ क्रमांकाच्या भडगाव-एरंडोल बसचा चालक ज्ञानेश्वर चव्हाण याने भरधाव वेगाने बस चालवताना नियंत्रण गमावल्याने बस नाल्यात पलटी झाली.

या अपघातात वडगाव (ता. पाचोरा) येथील गुलाब तुळशीराम महाजन (वय ५५) हे बसखाली दबून जागीच ठार झाले. तर १५ प्रवासी गंभीर जखमी असून त्यांच्यावर जळगावच्या जिल्हा रुग्णालयात आणि खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. ३५ प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यावर एरंडोल ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार सुरू आहेत.

जखमींमध्ये महिलांची व विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय असून अनेक जखमींना तातडीने उपचारासाठी हलविण्यात आले. दुर्घटनेची माहिती मिळताच तहसील प्रशासन, पोलिस, रुग्णवाहिका आणि एस.टी. महामंडळाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. बस क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

एरंडोल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल पाटील आणि त्यांचे सहकारी करत आहेत.

घटनेनंतर आमदार अमोल पाटील यांनी ग्रामीण रुग्णालयात भेट देत जखमींची विचारपूस केली. यावेळी विविध राजकीय, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, शिवसेना युवासेना जिल्हाप्रमुख प्रा. मनोज पाटील, छत्रपती क्रीडा मंडळाचे कार्यकर्ते, पत्रकार उपस्थित होते.

महत्त्वाची मदत जाहीर...

एस.टी. महामंडळाच्या वतीने अपघातात मृत व्यक्तीच्या वारसाला १० लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. गंभीर जखमींवरील उपचारांचा संपूर्ण खर्च महामंडळ उचलणार असून सर्व जखमींना प्रत्येकी ५०० रुपये तात्काळ मदत देण्यात आली आहे.


close