शिर्डी प्रतिनिधी: ( संजय महाजन )
सामाजिक बातमी
कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मुंबई जिल्हा अध्यक्षपदी विद्या प्रभू यांची निवड झाली आहे. विद्यमान अध्यक्ष मनोज वराडे आणि विद्या प्रभू यांच्यात लढत झाली. त्यात विद्या प्रभू विजयी झाल्या. यावेळी मुंबई जिल्ह्याची कार्यकारिणीही निवडण्यात आली.
केंद्रीय समितीवर जिल्हा प्रतिनिधी म्हणून जगदीश भोवड यांची निवड झाली. उपाध्यक्षपदी एकनाथ तांबवेकर, सचिवपदी संपदा मुळगावकर, खजिनदारपदी ज्योती कपिले यांची निवड झाली आहे. कार्यकारिणी सदस्य म्हणून मधुमंजिरी गटणे, रविकिरण पराडकर, श्रीकांत म्हात्रे, प्रशांत राऊत, वंदना पाटील आणि विकास वराडकर यांना नेमण्यात आले. निवडणूक अधिकारी म्हणून अरुण तुकाराम मोर्ये यांनी काम पाहिले.